जयंत कुलकर्णी।औरंगाबाद : इतर कोणत्याही दौºयापेक्षा इंग्लंडचा दौरा हा खडतर असतो. भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड याची इंग्लंड दौºयातील कामगिरी नेहमीच प्रभावी ठरली आहे. त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आपल्यासाठी मोलाचे ठरणार असल्याचे मत महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार अंकित बावणे याने मंगळवारी व्यक्त केले.जवळपास एका तपापासून रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या फलंदाजीचा कणा समजल्या जाणाºया अंकित बावणे याची भारतीय अ क्रिकेट संघात इंग्लंड दौºयासाठी निवड झाली आहे. भारत अ संघ २२ जूनपासून तिरंगी आणि चारदिवसीय कसोटी सामने, तसेच कौंटी संघाविरुद्ध दोन तीनदिवसीय सामने खेळणार आहे. भारत अ संघात निवड झाल्यानंतर अंकित बावणे याने पुणे येथून आज ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. अंकित बावणे म्हणाला, ‘‘इंग्लंडच्या दौºयासाठी भारतीय अ संघात निवड होणे ही माझ्यासाठी जबरदस्त संधी आहे. भारतीय संघासाठी अन्य दौºयांच्या तुलनेत इंग्लंडचा दौरा नेहमीच खडतर असतो व आव्हानात्मक असतो. भारतातील खेळपट्ट्यांच्या तुलनेत तेथील खेळपट्ट्या या वेगळ्या असतात आणि वातावरणही वेगळे असते. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर चांगला बाऊन्स असतो आणि हवेमुळे चेंडू चांगला स्विंगही होतो. त्यामुळे दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा सामना करणे आव्हानात्मक असेल.’’ अंकित बावणे याला इंग्लंड दौºयासाठी भारतीय अ संघात निवड होईल याचा विश्वास होता. याविषयी तो म्हणाला, ‘‘न्यूझीलंड संघाविरुद्ध मी नाबाद १६२ धावांची खेळी केली होती, तसेच वनडे सामन्यातही नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे इंग्लंड दौºयासाठी भारतीय अ संघात समावेश होईल याचा मला विश्वास वाटत होता. त्यामुळे पुणे येथे या दौºयासाठी आपण कसून तयारी करीत आहोत. दौºयाआधी भारतीय अ संघाचे बंगळुरू येथे शिबीर लागेल. या शिबिरातही आपण चांगली तयारी करून इंग्लंड दौºयासाठी स्वत:ला सज्ज ठेवण्याचा प्रयत्न असेल.’’ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य दिल्लीविरुद्ध नाबाद २५८ आणि न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १६२ धावांची खेळी आपल्या कारकीर्दीत विशेष असल्याचे अंकित मानतो. अंकित बावणे म्हणाला, ‘‘२0१६-१७ च्या हंगामात आधीच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी होऊ शकली नव्हती; मात्र दिल्लीविरुद्ध तब्बल दीड दिवस फलंदाजी करीत व प्रतिस्पर्धी संघाला एकदाही संधी न मिळू देता नाबाद २५८ धावांची खेळी करू शकलो, तसेच भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व करताना न्यूझीलंड अ संघाविरुद्ध त्यांचे गोलंदाज दर्जेदार असताना त्यांच्यासमोर केलेली नाबाद १६२ धावांची खेळी आपल्या कारकीर्दीतील केलेल्या सर्वोत्तम खेळ्यांपैकी आहे.’’ महाराष्ट्राच्या रणजी संघाचे आणि भारतीय अ संघाचे कर्णधारपद भूषवण्याची मिळालेली संधी जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे अंकित मानतो.रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आपण सातत्यपूर्वक कामगिरी केली आणि त्यानंतर रणजी संघाचे नेतृत्व करण्याची, तसेच भारतीय अ संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी ही आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहे. या संधीमुळे मानसिकतेवर परिणाम होऊन आणखी भरीव कामगिरी करण्याची ऊर्मी तुमच्यात निर्माण होते, तसेच आपल्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळतो, ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. चांगल्या कामगिरीमुळे मिळालेली शासन आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची शाबासकीची थाप ही आणखी मेहनत घेण्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे खेळाडू बिनधास्तपणे त्याच्या गुणवत्तेला न्याय देऊन चांगली कामगिरी करतो.’’अंकित बावणे याच्या कारकीर्दीतील हाइलाईट्सरणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रासाठी नेहमीच संकटमोचकाची भूमिका बजावणारा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने ७८ प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात ५२.१0 च्या भक्कम सरासरीसह १७ शतके आणि २८ अर्धशतकांसह ५ हजार ३६७ धावा फटकावल्या आहेत.२0१३ मध्ये आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाºया अंकितने याआधी दक्षिण आफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात न्यूझीलंड अ विरुद्ध कसोटीत नाबाद १६२ आणि वनडेत नाबाद ८९ धावांची खेळी करीत आपला ठसा उमटवला.यावर्षी देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय अ संघाचे आणि यंदाच्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा मिळाला बहुमान.अंकितने दिल्लीविरुद्ध स्वप्नील गुगळेच्या साथीने ५९४ धावांची विक्रमी भागीदारी करताना वैयक्तिक सर्वोत्तम नाबाद २५८ धावांची खेळी केली.रणजी संघाच्या कर्णधारपदाच्या पदार्पणातच सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशविरुद्ध ११७ धावांची शतकी खेळी.
द्रविडचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल -अंकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:01 AM
इतर कोणत्याही दौºयापेक्षा इंग्लंडचा दौरा हा खडतर असतो. भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड याची इंग्लंड दौºयातील कामगिरी नेहमीच प्रभावी ठरली आहे. त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आपल्यासाठी मोलाचे ठरणार असल्याचे मत महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार अंकित बावणे याने मंगळवारी व्यक्त केले. जवळपास एका तपापासून रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या फलंदाजीचा कणा समजल्या जाणाºया अंकित बावणे याची भारतीय अ क्रिकेट संघात इंग्लंड दौºयासाठी निवड झाली आहे. भारत अ संघ २२ जूनपासून तिरंगी आणि चारदिवसीय कसोटी सामने, तसेच कौंटी संघाविरुद्ध दोन तीनदिवसीय सामने खेळणार आहे. भारत अ संघात निवड झाल्यानंतर अंकित बावणे याने पुणे येथून आज ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
ठळक मुद्देइंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड : ...तर सिनिअर संघातील प्रवेश सुकर होईल