औरंगाबाद : पावसाअभावी अडचणीत आलेली खरिपाची पिके वाचविण्यासाठी सिंचन विभागाने जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, दि. ५ आॅक्टोबरपासून डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पुढील २१ दिवस पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास (कडा) चे मुख्य अभियंता ई. बी. जोगदंड यांनी सांगितले. जायकवाडी धरणात सध्या ४४.३१ टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्याने विभागात खरिपाची पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात येणाऱ्या पिकांना वाचविण्यासाठी जायकवाडीतून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने तातडीने पाणीपाळी देण्याचा निर्णय घेतला.
जायकवाडीतून शेतीला पाणी देणार
By admin | Published: October 04, 2014 11:59 PM