मार्ग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनावरील हा चालक आहे. मुंबईतील अधिकाऱ्यांच्या वाहनावर त्यांना कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. हे कर्तव्य बजावून हा चालक २८ फेब्रुवारी रोजीच परतला होता. त्याने १ मार्च रोजी कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला होता. १ आणि २ मार्च रोजी तो कामावर गेला नव्हता. परंतु ३ मार्च रोजी त्यास ड्युटी लावण्यात आली होती. त्यामुळे कार्यालयात गेला. परंतु काही मिनिटांतच त्यास फोन आला. कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याचे कळले. त्यामुळे तो निघून गेला आणि तत्काळ उपचारासाठी कोविड केंद्रात दाखल झाला. याविषयी विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
‘त्या’चौकशीचा आठवडाभरात अहवाल
एका वाहकाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. हृदयविकाराची शस्रक्रिया झालेली असतानाही मुंबईला ड्युटीला पाठविल्याने आगार व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. याप्रकरणी विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय लेखा अधिकारी यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी केली जात आहे. आठवडाभरात चौकशी पूर्ण होईल, असे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी सांगितले.