शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 5:08 PM

मुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ चालकाने दुचाकीवरील तिघांना वाचविले.

वाळूज महानगर : राँग साईडने आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याखाली गेल्याची घटना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ घडली. यामुळे दुचाकीस्वार वाचले परंतु, ट्रक उलटून शीतपेयाचे बॉक्स खाली पडले. यामुळे शीतपेयांचे बॉक्स लांबविण्यासाठी वाहनधारक व नागरिकांची झुंबड उडाली होती.

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कोकाकोला या कंपनीतुन शितपेयाचे बॉक्स भरुन आर.के.ट्रॉन्सपोर्टचा ट्रक (क्रमांक जी.जे.०१, एफ.टी.४८२७) या ट्रकचा चालक मगन हा १ डिसेंबरला वाळूज एमआयडीसीत बॉक्स पोडचविण्यासाठी निघाला होता. दरम्यान, मुंबई-नागपूर महामार्गावरुन लासुरमार्गे वाळूज एमआयडीसीत येत असतांना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ राँग साईडने सुसाट वेगाने ट्रिपल सीट दुचाकीस्वार ट्रक समोर आले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या खाली उतरविल्याला. हा ट्रक एका बाजुने कलंडला होता. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक चालक मगन ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या शोधात निघुन गेला. हीच संधी साधत काही नागरिकांनी शीतपेयांचे बॉक्स लंपास केले. 

ट्रकमधील शीतपेयांची बॉक्स लांबविण्यासाठी झुंबडट्रकजवळ कोणी नसल्याची संधी साधत लगतच्या वसाहतीतील नागरिक, प्रवासी वाहनधारकांनी शितपेयांचे अनेक बॉक्स हातोहात लांबवले. हा प्रकार लक्षात येताच मुजाहेद शेख व लगतच्या व्यवसायिकांनी नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांनी ट्रकमधील बॉक्स वाहनात तसेच डोक्यावर घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोना. भानुुदास पवार, पोकॉ. रविंद्र लाटे यांनी घटनास्थळ गाठल्याने बॉक्स लांबविणारे पसार झाले. या ट्रकमध्ये असलेल्या एकुण ९७२ शितपेयाचे बॉक्सपैकी १०८ बॉक्स गायब झाल्याचे ट्रकचालक मगन व त्याचा साथीदार प्रदीपसिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद