औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी आठवडाभरात दुसºयांदा मंगळवारी (दि. ३) औरंगाबादरेल्वेस्टेशनवर पाहणी केली. पाहणीदरम्यान एका प्रवाशाने थेट इंग्रजीमध्ये संवाद साधत रेल्वे पकडण्यासाठी होणारी गैरसोय व्यक्त केली. राभा यांनी ही बाब ऐकूण तर घेतली; परंतु काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता पाहणीसाठी सरळ पुढे निघून गेले. मात्र, अस्वच्छता पसरविणाºया प्रवाशांना फटके द्या, अशा सूचनात त्यांनी दिल्या.‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर विविध कामांचा धडाका सध्या सुरूआहे. कामांबरोबर रेल्वे अधिकाºयांकडून पाहणीचाही धडाका सुरू आहे. त्रिकालज्ञ राभा यांनी २६ नोव्हेंबर रोजीच पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला होता. या पाहणीनंतर मंगळवारी पुन्हा एकदा त्यांनी रेल्वेस्टेशनवरील कामांचा आढावा घेतला. यावेळी नांदेड विभागातील विविध अधिकाºयांचा ताफाच हजर होता. प्रारंभी राभा यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाची पाहणी केली. ‘की मॅन’ रेस्ट रूमचे काम सध्या सुरू आहे. या रूमच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.रेल्वेस्टेशनवरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह परिसरातील ऐतिहासिक इंजिन, बेट आणि परिसराचीही पाहणी केली. यावेळी परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसून आले. वारंवार सूचना देऊन, कारवाई करून अस्वच्छतेचा प्रकार थांबत नसल्याने रेल्वे व्यवस्थापकांनी प्रवाशांवर राग काढला. अस्वच्छता करणाºयांना फटके दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कर्मचारी निवास स्थळाचीही पाहणी केली. रेल्वेस्टेशन परिसरात होत असलेली कामे १२ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राभा यांनी दिले.काय म्हणाला प्रवासी...जुन्या रेल्वेस्टेशनसमोर त्रिकालज्ञ राभा हे पाहणी करीत होते. तेव्हा सर्वसामान्य एका प्रवाशाने त्यांच्या ताफ्यात प्रवेश करीत औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून निघणाºया रेल्वेंच्या वेळेत अंतर जास्त असल्याने बाहेरच्या प्रवाशांना नियोजित वेळेवर रेल्वे पकडता येत नाही, असे म्हटले. यावर राभा काहीतरी बोलतील, असे प्रवाशाला वाटले; परंतु प्रवाशाचे म्हणणे त्यांनी ऐकूण घेतले; परंतु काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
प्रवाशाने मांडलेल्या समस्येकडे दुर्लक्ष करीत ‘डीआरएम’ म्हणाले अस्वच्छता करणाऱ्यांना फटके द्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:51 PM
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी आठवडाभरात दुसºयांदा मंगळवारी (दि. ३) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. पाहणीदरम्यान एका प्रवाशाने थेट इंग्रजीमध्ये संवाद साधत रेल्वे पकडण्यासाठी होणारी गैरसोय व्यक्त केली.
ठळक मुद्देपाहणीचा धडाका : अपूर्ण कामे, अस्वच्छतेने भडकले, घाण करणाºया प्रवाशांना फटके देण्याचीही भाषा