शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 2:05 PM

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत.

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर) : जिल्हाभरात ग्रामीण भागात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांच्या अफवा असल्याने गावोगावी तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली असून रात्रीच्या वेळी नेमके कशासाठी ड्रोन वापरले जात आहेत? चोरीच्या उद्देशाने किंवा काही गैरप्रकारांसाठी तर नाही ना? या धास्तीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारे ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसतात. लग्नाचे जंगी सोहळे, जाहीर सभा-समारंभांमध्ये डोक्यावरून भिरभिरणारे ड्रोन्स विनापरवानाच असतात. त्याच्या वापरासाठी परवाना घ्यावा लागतो. याबाबत संयोजकही अनभिज्ञ असतात. ड्रोनच्या वापराचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसतानाही अनेकजण तो वापरतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. ड्रोन उडवायचा असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस यांच्यासह महापालिका किंवा पालिकेचा परवाना सक्तीचा आहे. तसे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनीच काढले आहेत; पण ड्रोन म्हणजे कॅमेऱ्याचाच एक भाग असल्याच्या भावनेत पोलिसांसह सारेच परवानगी गृहीत धरतात.

ड्रोन वापरायचा, तर हे पाहा नियमड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध आहेत. पोलिसांची व प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे, आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. तो उडविण्यासाठी प्रशिक्षित व प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहेत. असे प्रशिक्षण फक्त पुणे आणि दिल्लीत उपलब्ध असल्याने ते टाळण्याकडे कल आहे. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची यांविषयी अनेक नियम पाळावे लागतात.

ग्रामस्थांनी घाबरू नये - पोलीस अधीक्षकपैठण, वैजापूरनंतर आता गंगापूर तालुक्यात रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनची मोठी चर्चा सुरू आहे. हे ड्रोन नेमके कोण उडवतेय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी घाबरण्याची गरज नाही. या प्रकरणी पोलिस सखोल चौकशी करीत असून, विनापरवानगी रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी