शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

साडेतीन हजार गावे जलयुक्त तरी मराठवाड्यात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:15 PM

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली. चार वर्षांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळ काही केल्या हटेना. मात्र, या अभियानांतर्गत ३ हजार ७९२ गावे जलयुक्त झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

साडेतीन हजार गावे जलयुक्त तरी मराठवाड्यात दुष्काळपाणी कुठेतरी मुरतेय : चार वर्षांत २ हजार कोटींचा खर्च योजनेवरऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली. चार वर्षांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळ काही केल्या हटेना. मात्र, या अभियानांतर्गत ३ हजार ७९२ गावे जलयुक्त झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. आजवर योजनेवर सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. असे असताना मराठवाडा दुष्काळाच्या दावणीला बांधला गेला असून २ हजार कोटींचे पाणी कुठे मुरले, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे. २०१५-१६ मध्ये विभागात १६८२ गावे निवडली. त्यावर्षी १ हजार ७८ कोटी रुपयांतून १६७६ गावांत कामे पूर्ण केल्याचा दावा होतो आहे. २०१६-१७ मध्ये गावांची संख्या कमी केली. त्यावर्षी १५१८ गावांमध्ये ७८५ कोटी रुपये खर्च केला.

आजवर १४८९ गावांत कामे केली. २०१७-१८ या वर्षात अनेक गावांना वगळण्यात आले. यावर्षी निवडलेल्या १२४८ पैकी ६२८ गावांमध्ये कामे पूर्ण केली आहेत. यासाठी १५८ कोटी रुपये खर्च झाला. अभियानात गावे निवडल्यानंतर गावाच्या पाण्याच्या गरजेचे मोजमाप केले होते. जलयुक्त शिवार अभियनांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावात कामे पूर्ण करण्यात आली आहेत, त्यामुळे पाण्याची गरज पूर्ण झाल्यामुळे निवडलेली गावे जलयुक्त आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.

जलयुक्त शिवारांतर्गत काय मिळालेवर्ष पाणीसाठा विहीर पातळी वाढ२०१५ -१६ ३.२३ लक्ष टीसीएम २.५० मीटर२०१६ -१७ ३.१० लक्ष टीसीएम २.०० मीटर२०१७ -१८ १.८५ लक्ष टीसीएम २.०० मीटरएकूण ८.१८ लक्ष टीसीएम २.०० मीटर१ लाख ५९ हजार कामे केली पूर्ण२०१५ ते १८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली. ३५०० गावे जलयुक्त करण्यात आली, असा दावा प्रशासन करीत आहे. राज्य सरकारने गावे जलयुक्त करण्यासाठी केलेला गाजावाजा जनजागृतीसाठी फायदेशीर ठरला खरा; परंतु योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद