औरंगाबाद : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत ६०० छावण्यांतून चारा पुरवठा करावा लागेल. त्यासाठी अंदाजे ४१४ कोटी २७ लाख १६ हजार रुपयांचा खर्च विभागीय प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.
दुष्काळामुळे मराठवाड्यात चाऱ्याची अडचण निर्माण होणार असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. जानेवारीपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती असली तरी प्रशासनाने आतापासूनच टंचाईचा अंदाज बांधला आहे. जून २०१९ पर्यंत शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठे, तर ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० मेट्रिक टन इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच चारा सध्या आहे.
प्रशासनाचा संभाव्य अहवाल असाजानेवारी २०१९ मध्ये ११० छावण्यांतून २६ हजार मोठ्या, तर ५२०० छोट्या जनावरांना चारा लागेल. फेबु्रवारी २०१९ मध्ये १६१ छावण्यांतून ६ लाख २७ मोठे, २ लाख ३१ हजार छोट्या जनावरांना चारा लागेल.मार्च २०१९ मध्ये ३१० छावण्यांतून ७ लाख ११ हजार मोठ्या व २ लाख ४२ हजार छोट्या जनावरांना चारा लागेल. एप्रिलमध्ये ४७४ छावण्यांतून ७ लाख ४४ हजार मोठ्या आणि २ लाख ४८ हजार छोट्या जनावरांना चारा पुरविला जाईल. मे २०१९ मध्ये ६०० चारा छावण्यांतून ७ लाख ६४ हजार मोठ्या, तर २ लाख ५४ हजार लहान. जनावरांना चारा पुरविण्याचे नियोजन करावे लागेल. जून २०१९ मध्ये ५६९ छावण्यांतून ७ लाख १५ हजार मोठ्या, तर २ लाख ४९ हजार छोट्या जनावरांना चारा पुरवावा लागेल. जानेवारी ते जून २०१९ पर्यंत टप्प्याटप्याने छावण्यांचा आकडा वाढण्याचे संकेत प्रशासनाने अहवालात दिले आहेत. मराठवाड्यातील जिल्हानिहाय पशुधन
जिल्हा पशुधन औरंगाबाद १० लाख ६७ हजार ४१२जालना ६ लाख ९९ हजार २४परभणी ६ लाख २२ हजार २००बीड १२ लाख २४ हजार ७९८लातूर ७ लाख ५२ हजार ४२६उस्मानाबाद ७ लाख ३७ हजार ३४७नांदेड ११ लाख ४४ हजार ७२५हिंगोली ४ लाख ५९ हजार ६८०
एकूण ६७ लाख ६१२