शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:32 PM

दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून महोत्सव झाला नाही महोत्सावर दुष्काळाचे सावट

औरंगाबाद : जिल्ह्यातील आणि विभागातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. पुर्ण जिल्ह्यांतील परिस्थिती भयावर आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. 

२०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्यावर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते. परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावा की न करावा, यावरून प्रशासनाने आता शासनाकडे बोट दाखविले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे. 

वेरुळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी गेल्यावर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणार हा महोतस्व विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरूवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला.

दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही  आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जिल्ह्यासह विभागात दुष्काळ आहेच. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करूनच वेरूळ-अजिंठा महोत्सवाबाबत निर्णय होईल. मागील दोन वर्षांपासून महोत्सव झालेला नाही, ही बाब देखील खरी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महोत्सव घेणे योग्य वाटत नाही. काही वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रशासनाला काय वाटते यापेक्षा अडचणी काय आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय शासकीय पातळीवर चर्चा करूनच होईल. 

या कारणांनी महोत्सव रद्द झाला २००८- मुंबई दहशतवादी हल्लयामुळे रद्द २००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द २०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द २०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७- नियोजन होऊ शकले नाही२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार