शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

फिजिक्सच्या प्राध्यापकाचा नशेचा धंदा; छत्रपती संभाजीनगरात टाकल्या ड्रग्जच्या फॅक्टरी

By राम शिनगारे | Published: October 23, 2023 12:28 PM

पैठण एमआयडीसीत ड्रग्ज बनवून पाठवत होते गुजरातला; आत्महत्येच्या प्रयत्नामुळे उघड झाली कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीमध्ये चार वर्षांपासून औषधी बनवता बनवता त्यातील केमिकलमधूनच कोकेन, मेफेड्रोनसह इतर अंमली पदार्थ (ड्रग्ज) बनविण्यासाठी लागणारी पावडर वेगळी केली जाऊ लागली. फिजिक्सचा प्राध्यापक, मास्टरमाइंड आरोपी जितेशकुमार पटेल याने त्या पावडरचे अंमली पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. या अंमली पदार्थांची शहरातून गुजरातमध्ये तस्करी सुरू केली. अंमली पदार्थांचा हा काळाधंदा मागील चार वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुजरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अहमदाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. त्यात पकडलेल्या आरोपींनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कंपन्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुजरातच्या महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) विभागीय पथक, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक १५ दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाले. अत्यंत गोपनीयपणे पैठण एमआयडीसी, वाळूज एमआयडीसीतील एकूण तीन कंपन्यांची रेकी केली. या पथकाला कंपनीतच तयार झालेला अंमली पदार्थांचा साठा जप्त करायचा होता. मात्र, पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी कंपनीत तयार अंमली पदार्थ आरोपी जितेशकुमार प्रेमजीभाई ऊर्फ पटेल हा स्वत:च्या कांचनवाडीतील आलिशान बंगल्यात घेऊन येत होता. त्यामुळे डीआरआयच्या पुणे पथकाने शुक्रवारी (दि.२०) दुपारी १.३० वाजता जितेश पटेल याच्या घरी छापा मारला.

उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या फ्लोरेन्झा व्हिलाज् सोसायटीमध्ये जातानाच सुरक्षारक्षकांनी पथकाला अडवले. मात्र, पथकाने ओळख सांगितल्यानंतर आतमध्ये सोडले. डीआरआयच्या पथकाने पटेल याच्यासह त्याच्या पत्नीची शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत कसून चौकशी केली, तसेच घराची झडती घेतल्यानंतर २३ किलो कोकेन, २.९ किलो मेफेड्रोनसह ३० लाख रुपये रोकड सापडली. तेव्हाच जितेशकुमारला ताब्यात घेऊन डीआरआयच्या शहरातील विभागीय कार्यालयात आणले, तसेच महालक्ष्मी कंपनीचा मालक आरोपी संदीप कमावत यास ताब्यात घेतले. शनिवारी सकाळीच पथकाने महालक्ष्मी कंपनीवर छापा मारला. त्याठिकाणी ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाइन आणि इतर रसायनमिश्रित ९.३ किलो अंमली पदार्थ सापडले. दोन्ही आरोपींना शनिवारी शहरातील विभागीय कार्यालयात ठेवण्यात आले होते. तोपर्यंत शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा मागमूसही लागलेला नव्हता, हे विशेष.

घरात २६, तर कंपनीत १८ किलोआरोपी जितेशकुमार यांच्या घरात २३ किलो कोकेन, २.९ किलो मेफेड्रोन अंमली पदार्थांसह ३० लाख रुपयांची रोकड पथकास सापडली, तसेच पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीमध्ये ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाइन आणि ९.३ किलो वेगवेगळे रसायनयुक्त अंमली पदार्थ, अशी एकूण १८ किलो अंमली पदार्थ सापडले.

टॉयलेटला जाण्याचा बहाणा अन्...आरोपी जितेशकुमार यास शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक केली. रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास टॉयलेटला जाण्याचा त्याने बहाणा केला. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या खिडकीच्या काचेने स्वत:चा हात व गळ्याची नस कापली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच पथकाने जितेशकुमारला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डीआरआयने शहर पोलिसांचे संरक्षण मागितले.

चार वर्षांपासून होते पार्टनरगुजरातच्या पथकांनी अटक केलेला आरोपी जितेशकुमार पटेल आणि संदीप कमावत हे मागील चार वर्षांपासून पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीत पार्टनर होते. त्यांची ४० व ६० टक्के अशी हिस्सेदारी होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी जितेशकुमार याने कंपनीतील संपूर्ण पार्टनरशिप काढून घेतली. त्यानंतरही दोघांमध्ये सख्य होते. कंपनीत बनविण्यात येणारे अंमली पदार्थ मात्र जितेशकुमार हाच गुजरातला पाठवत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कंपन्यांना बनवून द्यायचा सेटअपआरोपी जितेशकुमार हा फिजिक्सचा प्राध्यापक आहे. तो औषधी कंपन्यांतील मशिनरींचा एक्स्पर्ट आहे. तो वेगवेगळ्या केमिकलमधून अंमली पदार्थ बनविण्यासाठीची पावडर वेगळी करण्याचा सेटअप कंपन्यांना तयार करून देतो. त्याने पैठण, वाळूज एमआयडीसीतील काही कंपन्यांना हा सेटअप बनवून दिल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले. अधिक चौकशी सुरू असतानाच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे, अशा संशयित कंपन्यांचा शोध घेण्यात डीआरआयच्या पथकाला अडथळा आला.

गुजरात, मुंबई, पुण्याच्या पथकांची छापेमारीपैठणसह वाळूज एमआयडीसीतील विविध कंपन्यांवर मारलेल्या छाप्यामध्ये गुजरातमधील डीआरआयचे विभागीय पथक, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते. त्याशिवाय डीआरआयच्या मुंबई, पुणे येथील विभागीय कार्यालयांतीलही कर्मचारी, अधिकारी तीन दिवसांपासून शहरात ठाण मांडून होते. एकूण ५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. शेवटी शहर पोलिसांना संरक्षणासाठी मदतीला बोलावण्यात आले.

वाळूज एमआयडीसीतील कंपनीला पोलिस संरक्षणडीआरआयने शहर पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार अंमली पदार्थाच्या तस्करीतील मुख्य आरोपी खासगी रुग्णालयात दाखल आहे. तेथे पाच पोलिसांचे आणि वाळूज एमआयडीसीतील एका संशयास्पद कंपनीला दोन पाेलिसांचे संरक्षण देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली होती.. त्यानुसार शहर पोलिसांनी संरक्षण पुरविल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘शहर पोलिस पकडताहेत खवा’छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातचे पोलिस येऊन कोकेन पकडतात. ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करतात आणि शहर पोलिस काय करतात, तर ते खवा, बर्फी पकडण्यात मग्न आहेत. त्यांना कोकेनची विक्री होत असल्याचे माहिती नाही का? राज्यात सगळीकडे ड्रग्जची विक्री होत आहे. नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उघडला जातो. राज्य सरकार झोपलेले आहे. तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात टाकले जात आहे.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ