जालना : शहरासह जिल्ह्याचा पारा ४० अंशांवर गेल्याने नागरिक घामाघुम झाले आहेत. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून दुपारनंतर रस्त्यावरची वर्दळ मंदावत आहे.शनिवारी असलेला ३९ अंश तापमान रविवारी ४० अंशावर गेले. उन्हाच्या तीव्रतेमुळे खाजगी तसेच शासकीय दवाखान्यात रूग्ण संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण भागात कडक उन्हामुळे शेती कामे दुपारनंतर बंद असतात. सकाळीच शेती कामे उरकण्यावर भर आहे.
वाढत्या तापमानाने जालनेकर घामाघुम
By admin | Published: March 26, 2017 11:02 PM