धावण्याच्या स्पर्धेत पाच आणि दहा किलोमिटर, सायकलिंगमध्ये दहा आणि वीस किलोमिटर प्रकारात स्पर्धा होईल. ड्यूएथलॉन मध्ये स्पर्धकांना पहिल्या प्रकारात दहा किलोमिटर सायकलिंग आणि पाच किलोमिटर धावणे तर दुसर्या प्रकारात वीस किलोेमिटर सायकलिंग तर दहा किलोमिटर धावायचे आहे. विजेत्यांना मेडल आणि टोपी देण्यात येणार आहे.
५ ते ७ पेâब्रुवारी अशा तीन दिवस ही स्पर्धा व्हच्र्यूअल पध्दतीने होणार असून कोणत्याही शहरातील स्पर्धक यात सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी नावनोंदणी १ जानेवारीपासून सुरु झाली आहे.www.getgoingabd.com जाऊन ही नोंदणी ३१ जानेवारीपर्यंत करावयाची आहे. पत्रकार परिषदेला गेट गोर्इंगच्या डॉ.उमा महाजन, डॉ. निती सोनी, डॉ.संतोष तोतला, डॉ. प्रिया देशमुख यांच्यासहं डॉ. चारुशिला देशमुख, , डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. संगिता देशपांडे, निना निकाळजे, दिपा डाबरी, डॉ. वंदना मिश्रा,डॉ. भावना लोहिया ,निरुपमा नागोरी, आरती अग्रवाल यांची उपस्थिती होती.