औरंगाबाद : दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले.सिडको बसस्थानकावर अभ्यंगस्नानाचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या दिवसांतही घरापासून दूर असणाºया या एसटीच्या कर्मचाºयांनाही दिवाळीचा आनंद मिळावा, यासाठी विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक अािण अन्य अधिकारी-कर्मचाºयांनी प्रयत्न केले. त्यांना अभ्यंगस्नानासाठी उटणे, साबण आणि तेल देण्यात आले. यानंतर विश्रामगृहात फराळ देण्यात आला. यामुळे आपण आपल्या परिवारासोबतच दिवाळी साजरी करीत आहे, असा आनंद कर्मचाºयांना झाला होता. अनेक वर्षे ही दिवाळी स्मरणात राहील, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी वाहक-चालकांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रादेशिक अधिकारी एम.बी. पठारे, विभाग नियंत्रक पी.पी. भुसारी, विभागीय वाहतूक अधिकारी अहिरे, घोडके, तसेच किशोर सोमवंशी, रमेश विधाते, आगार व्यवस्थापक पी.पी. देशमुख, गणेश वंजारे, महेश बोचरे, राहुल दहातोंडे, ज्ञानेश्वर मुंडे, सचिन तुपे, संजू धनवई, प्रकाश झिंझुर्डे आदींची उपस्थिती होती.
दिवाळीनिमित्त एसटी चालक-मालकांना अभ्यंगस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:01 AM