औरंगाबाद : मराठवाड्यातील बाराशेंपेक्षा जास्त गावांवर दुष्काळाचे सावट असून खरीप हंगामातील पीक हातचे जाण्याची भीती आहे. विभागात सुमारे ८ हजार ५०० गावे असून त्यातील ५९ मंडळांमधील १२०० पेक्षा जास्त गावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.पावसाअभावी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. परभणीतील १ मंडळ पूर्णत: अवर्षणग्रस्त झालेले आहे. तर ५९ मंडळांत पावसाने दगा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७०० गावे, जालना- ४२०, परभणी - ३८०, हिंगोली - २००, नांदेड -४३०, बीड - ५००, लातूर- ४८० तर उस्मानाबादच्या ४४० गावांमध्ये टंचाई निर्माण होऊ शकते.
मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:27 AM