सोयगाव : दुष्काळ तसा जीवघेणाच असतो, परंतु हाच दुष्काळ मजुरांच्या हाताला काम अन् भविष्यातील जलसंधारणाला बळकटी देण्यासाठी पावणारा ठरावा, या दिशेने शासनाने पावले उचलली आहेत. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पाच विहिरींचे कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात नऊ हजार विहिरींची कामे सुरु होणार असल्याने जिल्ह्यात जलसंधारणच्या कामांना बळकटी मिळणार आहे.या निर्णयानुसार सध्या स्थितीत नव्या व जुन्या मिळून जिल्ह्यात ७८० विहिरींची कामे पूर्णत्वास आली आहेत. मागासवर्गीय व छोट्या शेतकऱ्यांना शासनामार्फत विहीर खोदकामासाठी अनुदान दिले जाते, मात्र यातील गैरप्रकार वाढल्याने २०१४ पासून रोहयोतून या विहिरी केल्या जात आहेत. यात तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे ही योजना ऐन दुष्काळात लोकप्रिय होऊन उदंड प्रतिसाद मिळत आहे. या निर्णयानुसार सोयगाव तालुक्यात मागील वर्षीच्या अपूर्ण असलेल्या ११२ विहिरींची काम तातडीने हाती घेण्यात येऊन दुष्काळातही विहिरींच्या विक्रम संचिका प्राप्त होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी दिली.दरम्यान, शासनाने ऐन दुष्काळात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना हाती घेऊन जुन्या व नव्या योजनेतील उद्दिष्टात जिल्ह्याच्या विहिरींची प्रशासकीय मान्यता अडकली होती. सोयगाव तालुक्यात अडकलेल्या मान्यता मिळवून घेण्यासाठी गटविकास अधिकारी राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या विहिरींची कामे हाती घेतली आहे.सोयगाव तालुक्यात ४३५ विहिरींना मान्यताशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळात मजुरांना रोजगार आणि पावसाळ्यात या नवीन विहिरींना पाणी मिळून शेतीला मुबलक पाणी मिळेल. सोयगाव तालुक्यात ४३५ नवीन विहिरींना मान्यता मिळाली असून, कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांनी दिल्या आहेत. यासाठी एक कोटी आठ लाख ८१ हजारांच्या निधीची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन दुष्काळात जुन्या व नव्या मिळून सहाशेच्या वर नवीन विहिरी होणार आहेत.कोटसोयगाव तालुक्यात ऐन दुष्काळात मजुरांच्या हातांना कामे मिळावी, यासाठी सर्वच योजना गतिमान करून राबविण्यात येत आहेत. पहिले प्राधान्य विहिरींना देण्यात येऊन नुकतीच ग्रामसेवकांची बैठक घेऊन या कामांना गती मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे.-एम.सी राठोड, गटविकास अधिकारी, सोयगावतालुकानिहाय विहिरींची संख्याऔरंगाबाद ४१२गंगापूर १३९१कन्नड ५५९पैठण ६५फुलंब्री १३७९सिल्लोड १०५५सोयगाव ४३५वैजापूर १५२१
दुष्काळामुळे जिल्ह्याला नऊ हजार विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:31 PM