औरंगाबाद : रेल्वेच्या बोगीत धूर पाहून आग लागल्याच्या भीतीमुळे प्रवाशांनी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची घटना गुरुवारी जालना-बदनापूरदरम्यान घडली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, कु ठेही आग लागलेली नसून अफवेमुळे हा गोंधळ उडाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सचखंड एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जालन्याहून रवाना झाली. त्यानंतर अवघ्या काही अंतरावर रेल्वेच्या बोगीत एका प्रवाशाला धूर निघत असल्याचे निदर्शनास पडले. त्याने आग लागल्याची शंका व्यक्त केली. अवघ्या काही वेळेतच इतर प्रवाशांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यामुळे प्रत्येक जण घाबरून गेला. घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. रेल्वेची गती कमी झाली. मात्र, रेल्वे थांबण्यापूर्वीच अनेक प्रवाशांनी सामान बाहेर फेकत उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी प्रवासी थांबून होते. कुठे आग लागली, अशी विचारणा प्रवासी एकमेकांना करीत होते.रेल्वे अचानक थांबल्याने रेल्वेतील गार्ड आणि रेल्वे कर्मचाºयांनी बोगींची पाहणी केली; परंतु धूर, आग काहीही दिसले नाही. काहीही झालेले नसल्याचे स्पष्ट होताच प्रवाशांनी नि:श्वास घेतला. त्यानंतर ही रेल्वे औरंगाबादकडे रवाना झाली.धूर कशाचा?रेल्वेतील स्वच्छतागृहात एक व्यक्ती सिगारेट पीत होती. त्यामुळे धूर दिसल्याने हा प्रकार झाल्याचे काहींनी सांगितले, तर रेल्वेतील अग्निशमन सिलिंडरच्या गळतीमुळे हा प्रकार झाल्याचेही काहींनी सांगितले. याविषयी ‘दमरे’च्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता धुराचे, कारण स्पष्ट झालेले नाही. ही सर्व अफवा होती, असे त्यांनी सांगितले.
आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी मारल्या धावत्या रेल्वेतून उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:47 PM
रेल्वेच्या बोगीत धूर पाहून आग लागल्याच्या भीतीमुळे प्रवाशांनी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची घटना गुरुवारी जालना-बदनापूरदरम्यान घडली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, कु ठेही आग लागलेली नसून अफवेमुळे हा गोंधळ उडाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देजालना-बदनापूरमधील घटना : आग ठरली अफवा, सचखंड एक्स्प्रेसमधील प्रकाराने प्रवासी भयभीत