गजेंद्र देशमुख , जालना जालना शहरातील सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेत काळानुरूप बदल करण्यात न आल्याने शहराचा विकास खुंटत असल्याचे मत लोकमत सर्व्हेक्षणातून व्यक्त केले. एकूणच नगर पालिकेने शहर परिसरातून रस्त्यांना सुयोग्य अशी सीटीबस व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी या सर्व्हेक्षणातून प्रकर्षाने समोर आली. प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण झाले. यात तीन प्रश्न विचारण्यात आले. यात प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकासास पूरक की मारक या प्रश्नावर अनेकांनी मत भिन्नता व्यक्त केली. या प्रश्नावर ७० टक्के जनतेला वाहतूक व्यवस्था विकासासाठी पूरक वाटते. २० टक्के वाचकांना नाही असे वाटते. १० टक्के वाचकांनी याबाबत काही माहिती नाही. शहर पसिराचा विकास वाढत आहे. त्या दृष्टीने नगर पालिकेने सीटीबस अथवा अन्य वाहनांचा पयार्य निवडण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. सार्वजनिक व्यसस्था सुरळीत झाल्यास विकास होईल का या प्रश्नावर ५० टक्के वाचकांना विकास होईल असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही तर २० टक्के वाचकांना याबाबत काहीच माहिती नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतेय असे वाटते का? यावर ८० टक्के वाचक होय म्हणतात. ५ टक्के वाचक नाही म्हणतात तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत.
वाहतूक व्यवस्थेअभावी शहराचा विकास रखडला...!
By admin | Published: July 28, 2016 12:20 AM