लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आकाशातून जाणारे विमान पाहून आपल्याला कधी त्यात बसून प्रवास करता येईल, असा प्रश्न मनात निर्माण होत असे. लोकमतच्या संस्काराचे मोती या उपक्रमातून तरी आपली इच्छा पूर्ण व्हावी, या आकांक्षेने दोन वर्षापासून कूपन्स चिटकवून सहभाग घेत असे. कधी ना कधी आपला नंबर लागेल, असा माझा आत्मविश्वास होता आणि तो खराही ठरला. विमानाचा प्रवास आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याशी संवाद साधण्याचा योग केवळ लोकमतच्या संस्काराचे मोती, या उपक्रमामुळे माझ्या नशिबात आला, अशा शब्दात लोकमत हवाई सफरचा भाग्यवान विद्यार्थी सोहम नवनाथ यादवने मनोगत व्यक्त केले.बीड येथील संस्कार विद्यालयाचा चौथीचा विद्यार्थी सोहमचा लोकमत कार्यालयात वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोहमचे वडील नवनाथ यादव उपस्थित होते. यावेळी सोहम आपल्या हवाई सफरचे वर्णन करत होता. लोकमत संस्काराचे मोती, या उपक्रमातून माझी केवळ हवाई सफरच झाली नाही तर ज्ञानाची शिदोरीही वाढली आहे. दरवर्षी जिल्ह्यातून एकाचाच हवाई सफरसाठी नंबर लागत असला तरी इतरांनी नाराज होण्याचे काही कारण नाही. संस्काराच्या मोतीमधून जो मजकूर दररोज प्रसिद्ध होत असतो, तो मजकूर आपल्या ज्ञानात भर घालतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे, असा संदेशही सोहमने यावेळी दिला.मुंबई-दिल्ली प्रवास करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या आम्ही संवाद साधला. त्यांच्यासोबत नाश्ता घेतला. फोटो काढले. उपराष्ट्रपती अन्सारी यांनी तर आम्हाला टी शर्ट, टोपी, पेन दिला. सोबत असलेले लोकमतचे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी लोकमत उपक्रमाची माहिती दिली. राष्ट्रपती भवनातील तो थाट अविस्मरणीय असा होता, असे सोहम म्हणाला.
‘लोकमत’मुळेच विमान प्रवास अन् राष्ट्रपतींची भेट
By admin | Published: June 24, 2017 12:18 AM