शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ढिसाळ कारभारामुळे जिल्हा परिषदेला ५४ लाखांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:32 PM

औरंगाबाद : जिल्हा परिषद लीगल सेलच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्हा परिषदेला नुकसानभरपाईच्या दाव्यापोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचा भुर्दंड बसला ...

औरंगाबाद : जिल्हा परिषद लीगल सेलच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्हा परिषदेला नुकसानभरपाईच्या दाव्यापोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे. दरम्यान, आजच्या लीगल सेलच्या नियोजित आढावा बैठकीची सलग दोन वेळा पूर्वकल्पना दिल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर बैठकीकडे फिरकल्याही नाहीत. त्यामुळे अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात जि.प.अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले की, न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हा परिषदेची बाजू मांडण्यासाठी पॅनलवर असलेल्या वकिलांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. असे असताना न्यायालयाच्या आदेशानुसार सातत्याने जिल्हा परिषदेविरुद्ध अवमान याचिका दाखल होतात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक, टेबल, खुर्च्या जप्त होतात. जिल्हा परिषदेचे बँक खाते सील केले जातात, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. तथापि, न्यायालयात पॅनलवरील वकील आपली भूमिका व्यवस्थित बजावत नसल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत तसेच स्थायी समितीमध्ये पॅनलवरील वकील बदलण्याचा सभागृहाने निर्णय घेतला होता. त्यानुसार वकिलांच्या पॅनलचा आढावा घेण्यासाठी, सध्या उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी आज शुक्रवारी आढावा बैठक आयोजित केली होती.

जि.प.च्या लीगल सेल समितीवर अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत. मात्र, आजच्या बैठकीस केवळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे हे दोनच अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे हे रीतसर रजेवर होते; पण मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना बैठकीची सलग दोन वेळा पूर्व कल्पना दिलेली असताना त्या बैठकीकडे फिरकल्या नाहीत, या शब्दांत अध्यक्षा डोणगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.

न्यायालयीन प्रकरणांबाबत बनसोडे अनभिज्ञअध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या, शासनाच्या परिपत्रकानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लीगल सेलच्या समन्वयकाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. न्यायालयीन प्रकरणांची कोणतीही नोंद त्यांनी ठेवलेली नाही. दर मंगळवारी न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेऊन त्यासंबंधीचा अहवाल त्यांनी ‘सीईओं’ना सादर करणे गरजेचे असताना बनसोडे यांनी अशा प्रकारचा कोणताही अहवाल किंवा आढावा घेतलेला नाही.

पॅनलवर ३१ वकीलजिल्हा परिषदेच्या पॅनलवर उच्च न्यायालयात २२ आणि जिल्हा न्यायालयात ९ वकील कार्यरत आहेत. उच्च न्यायालयात जिल्हा परिषदेची ६३४ प्रकरणे दाखल आहेत. यापैकी १९० प्रकरणांत जि.प.च्या बाजूने निकाल लागले, तर ४८ प्रकरणांत विरोधी निकाल लागले आहेत. तब्बल ३९६ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा न्यायालयात ३७१ प्रकरणे दाखल असून, ३७ प्रकरणांमध्ये जि.प.च्या बाजूने निकाल लागले, तर ७ प्रकरणांत विरोधी निकाल लागले आहेत. ३२७ प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रकरणांबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांवर नियंत्रण अधिकाºयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद