खुलताबाद : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जटवाडा रस्त्यांचे काम पूर्ण केले असले तरी सुरुवातीचा काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्ता अर्धवट सोडल्याने या रस्त्यावर मोठमोठी भगदाडे पडली आहे. यामुळे पावसाळ्यात वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.
हर्सूल- जटवाडा- काटशिवरी फाटा(गदाणा) या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर २५ कोटी रुपये वर्षभरापूर्वी खर्च करण्यात आले आहे. यात उर्वरित सर्व डांबरीकरणाची, पुलाची, घाट रुंदीकरणाची कामे झाली असून, फक्त काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी रस्ताच अपूर्ण राहिला आहे. हा रस्ता पूर्णत: उखडला असून, मोठमोठी भगदाडे पडल्याने पावसाळ्यात छोटेमोठे अपघात होत आहे. सुमारे २५ गावांच्या लोकांना जटवाडामार्गे औरंगाबादला जाण्यासाठी हा मधला मार्ग अत्यंत नजीकचा आहे. त्याचबरोबर सिडको, हडको भागातील भाविकांना वेरूळ, खुलताबादला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने या रस्त्यावर रहदारी वाढली आहे. मात्र, पावसाळ्यात हा दोन कि.मी. रस्ता धोकादायक बनल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
फोटो कॅप्शन : काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्ता अर्धवट राहिल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.
310821\4755img-20210831-wa0097.jpg
काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन किमी रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे छोटेमोठे अपघात होवून अनेकांना अपंगत्व आले आहेत.