लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांनी सकाळी सात वाजेपासून बँकांसमोर रांगा लावल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळाले. बहुतांश शेतकºयांनी मध्यवर्ती बँकांच्या विविध शाखांमध्ये आॅफलाइन पद्धतीने पीकविमा भरला. शेतकºयांच्या गर्दीमुळे मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाºयांना जेवायलाही वेळ मिळाला नाही. सर्व शाखांसमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.आठवडाभरापासून पीकविमा भरण्यासाठी वाढत्या गर्दीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बहुतांश शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांमध्ये आॅफलाइन पद्धतीने पीकविमा भरला. मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसह छत्रपती शिवाजी व्यापार संकुल, नवीन मोंढ्यातील बँके समोर महिला पुरुष शेतकºयांची प्रचंड गर्दी दिसून आली. तुरळक शेतकºयांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा भरला. मध्यवर्तीच्या बहुतांश शाखांमध्ये कृषी विभागाचे कर्मचारी शेतकºयांना मदत करताना दिसले.मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात विमा अर्ज भरल्याने ३१ जुलै २०१७ अखेर सरासरी चार लाख शेतकºयांनी पीकविमा भरला असावा, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.वर्ष २०१६-१७ मध्ये सुमारे साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा भरला होता. मात्र, पीक परिस्थिती चांगली असल्याने शेतकºयांना खूपच कमी परतावा मिळाला. वर्ष २०१५-१६ मध्ये दुष्काळी स्थितीत पिके वाया गेल्याने जिल्ह्यास पीकविम्यापोटी ४७५ कोटीची भरपाई मिळाली होती, असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले. मंठा अर्बन बँकेने हेलस गावात जाऊन शेतकºयांकडून पीकविमा अर्ज भरून घेतले.वडीगोद्री नियोजनामुळे समाधानवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाºयांनी वैयक्तिक लक्ष देऊन रात्री उशिरापर्यंत शेतकºयांकडून पीकविमा अर्ज स्वीकारले.एकही शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू नये याची काळजी कर्मचारी वर्गाने घेतली. यासाठी वडीगोद्री जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक बी. यु. कराळे, आर. बी. देशमुख, डी. बी. खरात, एच. एम. आटोळे यांनी प्रयत्न केले.तर समर्थ कारखाना व बँकेचे कर्मचारी व्ही. के. घुगे, ए. बी. तारख, एस. बी. घाडगे, जे. व्ही. जाधव, व्ही. आर. दखने, आर. बी. पठाण तसेच कृषी सहाय्यक व्ही. एस. कड, एस. एस. श्रीगंदेवार यांनी परिश्रम घेतले. शेतकºयांनी अत्यंत संयम व शिस्तबद्ध पद्धतीने पीक विमा भरल्याचे व्यवस्थापक कराळे यांनी सांगितले. तालुका कृषिअधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळाधिकारी गणेश कछवे, वैभव घोडके यांनी शाखेत येऊन शेतकºयांना मदत केली.
मुदतीच्या धसक्याने शेतकरी रांगेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:41 AM