औरंगाबाद : शहरातील खराब आणि धुक्याच्या वातावरणाचा विमान प्रवाशांना फटका बसला. दिल्ली आणि मुंबईहून सकाळी आलेली दोन्ही विमानांना आकाशात घिरट्या माराव्या लागले. खराब वातावरणाने उतरणे शक्य नसल्याने अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला गेली.
दिल्ली आणि मुंबई दोन्ही विमाने शहराच्या आकाशात दाखल झाली. परंतु धुक्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी दृश्यमानता पुरेशी नव्हती. त्यामुळे दोन्ही विमानांनी काही वेळेसाठी शहरावर चार ते पाच घिरट्या मारल्या. तरीही योग्य दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्ली, मुंबईहून औरंगाबादला येणारे प्रवासी विमानात आणि या दोन्ही शहरांना जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळत आहे.