शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

विमानसेवेमुळे ‘अब दिल्ली दूर नहीं’; वर्षभरात लाखांवर विमान प्रवास्यांची राजधानीत ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 5:43 PM

मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ

औरंगाबाद : औरंगाबादहूनदिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेमुळेदिल्लीला अवघ्या २ तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. मागील वर्षभरात एक लाखांवर प्रवाशांनी दिल्लीला विमानाने ये-जा केली, तर मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ आहे.

औरंगाबादहून सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. कोरोनामुळे बंगळुरु आणि अहमदाबादची विमानसेवा खंडित झाली आहे. दिल्लीला जाण्यासाठी आजघडीला सचखंड एक्सप्रेस आहे. रेल्वेबरोबर दिल्लीसाठी हवाई कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. गतवर्षी सकाळच्या वेळेतही दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यामुळे सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परतही येता येत होते. परंतु, तिसऱ्या लाटेमुळे दिल्लीचे सकाळचे विमान बंद झाले. सध्या सायंकाळीच विमान आहे. मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. त्याबरोबरच विमानानेही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे.

शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरु येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही विमान सेवा खंडित झाली होती. परंतु, पहिली लाट ओसरल्यानंतर ही विमानसेवा डिसेंबर २०२०मध्ये पुन्हा सुरू झाली होती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही विमानसेवा पुन्हा बंद पडली. बंगळुरु विमानसेवेसह अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

कनेक्टिंग फ्लाईटने गाठली ही शहरेऔरंगाबादेतून दिल्ली, मुंबईला विमानाने गेल्यानंतर कनेक्टिंग फ्लाईटने इतर शहरही गाठले जाते. गेल्या वर्षभरात चेन्नईला १२४१, कोलकाता येथे ४४७, जयपूर येथे ३४२ आणि वडोदरा येथे ३ प्रवाशांनी प्रवास केला.

बंगळुरुसाठी सुरू व्हावी पुन्हा विमानसेवाबंगळुरुसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. औरंगाबादहून बंगळुरूसाठी १८० आसनी विमान आठवड्यातून २ दिवस किंवा ७२ आसनी विमान आठवड्यातून ५ दिवस सुरू केले तर प्रवाशांची सुविधा होईल. त्याबरोबर हैदराबादला जाणारे विमान सध्या प्रवाशांनी भरून जात आहे. हैदराबादसाठी आता मोठे विमान सुरू करणे गरजेचे आहे, असे औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार म्हणाले.

सन २०२१मधील विमान प्रवाशांची संख्या (येणारे आणि जाणारे एकत्रित)शहर - विमान प्रवासीदिल्ली - १,११,९३२मुंबई - ९३,०१७हैदराबाद - ३०,१६१बंगळुरु - ६,९४१अहमदाबाद - ४,१६७

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानdelhiदिल्लीAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ