शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घाटी रुग्णालयात पद भरतीला खोडा; बारामतीसाठी मात्र पदनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 6:24 PM

याचा रुग्णसेवेवर थेट परिणाम होत आहे.

ठळक मुद्देघाटीतील कर्मचाऱ्यांवर वाढता ताणजळगावला पळविले डॉक्टर

औरंगाबाद : बारामती येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली; परंतु नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विभागाच्या पदनिर्मितीसह घाटीतील रिक्त पदे भरण्यास मात्र वर्षानुवर्षे खोडा घातला जात आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असून, रुग्णसेवेवरही परिणाम होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. याठिकाणी डॉक्टर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे रुग्णसेवेला फटका बसत आहे. बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ५०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. या नव्या महाविद्यालयासाठी ५१०, तर रुग्णालयासाठी ५७१ पदांच्या निर्मितीसाठी ८ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. 

गेल्या महिनाभरात आचारसंहितेपूर्वी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बारामती येथील प्रश्न, मागण्या शासन निर्णयाद्वारे मार्गी लावण्यात आले; परंतु घाटीतील प्रश्नांकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. घाटी रुग्णालयात ११७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात १५०० रुग्णांवर उपचार होतात. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १९०० ते २२०० रुग्ण येतात. रुग्णालयात वर्ग एक ते चारपर्यंतच्या सातशेवर  जागा रिक्त आहेत. यात एकट्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जवळपास २५१ जागा रिक्त आहेत. ही पदे भरण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.

जळगावला पळविले डॉक्टरघाटी, कर्करोग रुग्णालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापक असे १२ डॉक्टर आॅगस्ट-२०१८ मध्ये जळगावला पळविण्यात आले. यात बालरोग चिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, रोगप्रतिबंध, क्ष-किरणशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र विभागांतील डॉक्टरांची बदली झाली. त्यांच्या जागी अद्याप कोणी डॉक्टर आलेले नाहीत.

‘सुपरस्पेशालिटी’ला पदनिर्मितीची प्रतीक्षाकेंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने घाटीत उभारण्यात येणारे २२० खाटांचे स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच हा विभाग सज्ज होणार आहे; परंतु अद्यापही या विभागासाठी पदनिर्मिती झालेली नाही. परिणामी, विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे.

जागा भरण्यासाठी प्रक्रियाघाटीतील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीState Governmentराज्य सरकार