शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

दुर्गा उत्सवास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:07 AM

गुुरुवारपासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात १५१८ दुर्गादेवींची स्थापना केली जाणार आहे़ नवरात्रोत्सवानि

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गुुरुवारपासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात १५१८ दुर्गादेवींची स्थापना केली जाणार आहे़नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे़ गुरुवारी घटस्थापनेनंतर पुढील नऊ दिवस जिल्ह्यात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो़ माहूर येथे रेणुकादेवी, दत्तशिखर, अनुसया माता मंदिर, देवदेवेश्वरी या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात यात्रा भरते़ महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातून यात्रा काळात तब्बल सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येतात़तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माता रत्नेश्वरी या ठिकाणीही मोठ्या नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते़ येथील यात्रेतही दररोज जवळपास २० हजार भाविक दर्शनासाठी येतात़दसºयानिमित्त नांदेड शहरात शीख बांधवाकडून हल्लाबोल व मातासाहिब गुरुद्वारा येथे जन्मोत्सव सोहळ्यासाठी देश-विदेशातील भाविकांची उपस्थिती होती़ त्याचबरोबर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून संचलनही करण्यात येते़बौद्ध समाजाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो़ त्यासाठी १७ ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात येतो़ तर जिल्ह्यात २२ ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ ३१ ठिकाणी मिरवणुका व १६ ठिकाणी बालाजी रथ निघणार आहे़ त्याचबरोबर नवरात्रोत्सवात सर्वांचे आकर्षण असलेल्या दांडीयासाठीही नियोजन करण्यात आले आहे़ एकुण ६५ ठिकाणी दांडीयाचे आयोजन केले आहे़ग्रामीण भागात मोहरमनिमित्त ४९४ सवारी, ८९ ताजे, ३३५ पंजे, ५१ डोले, १८ नाल यांची स्थापना होवून १ आॅक्टोबर रोजी विर्सजन करण्यात येणार आहे़या सर्व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलिस अधीक्षक, ११ उपविभागीय अधिकारी, ४० पोलिस निरिक्षक, ११७ सपोनी, पोउपनी, २६६१ पोलिस कर्मचारी, २८४ महिला पोलिस कर्मचारी, ८ दंगा नियंत्रण प्लाटून, राज्य राखीव दलाच्या ३ प्लाटून, १०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड आदी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत़