शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:23 AM

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ

संजय जाधवपैठण : भर दुष्काळातही जायकवाडी धरणातून (नाथसागर) यंदा सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून शेतीच्या उत्पादनात जवळपास २५० कोटी रूपयांची वाढ झाली आहे. लाभक्षेत्रात मनासारखे पाणी मिळाल्याने बळीराजानेही यंदा भरभरून पाणीपट्टीचे माप जायकवाडी प्रशासनाच्या तिजोरीत टाकले आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक म्हणजे २८ कोटी ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी यंदा सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातून वसूल केल्याचा विक्रम जायकवाडी प्रशासनाने केला आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७ टक्के जलसाठा झाला होता. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या कालवा सल्लागार समितीत योग्य नियोजन करून पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले. जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १५ आॅक्टोबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०१८ असे ४६ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या कालावधीत ७.३४ टीएमसी पाणी जलाशयातून देण्यात आले. दुसरे आवर्तन २४ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०१९ असे ३५ दिवस सोडण्यात आले. या कालावधीत ५.६६ टीएमसी पाणी जलाशयातून खर्ची झाले.दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखालीकालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. लाभक्षेत्रात यंदा कापूस, कडधान्य, गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, मिरची, हळद, ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांचे उत्पादन जोरात घेण्यात आले. यंदा गहू पिकाखाली येणारे क्षेत्र एकूण लाभक्षेत्राच्या १८ टक्के एवढे होते. जायकवाडी धरणातून वेळेवर पाणी मिळाल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.उद्दिष्ट ७ कोटींचे, वसुली २८ कोटी ३४ लाखांचीसिंचन व बिगर सिंचन या क्षेत्रातून जायकवाडी प्रशासनासमोर यंदा ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जायकवाडीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण केल्याने तब्बल २८ कोटी ३४ लाख १२ हजार रूपयांची पाणीपट्टी जायकवाडीच्या तिजोरीत जमा झाली आहे. यात जलाशय उपसा पाणीपट्टी १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, प्रवाही कालवा पाणीपट्टी ४२ लाख ४९ हजार, कालवा उपसा पाणीपट्टी ७ लाख ७४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ११ हजार रुपये वसूल झाले आहेत. बिगर सिंचन प्रकारात २६ कोटी २७ लक्ष ३४ हजार रुपये व बिगर सिंचन समायोजन २६ लाख २७ हजार रुपये असे एकूण २८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये पाणीपट्टी यंदा वसूल झाली. गेल्या दहा वर्षात २००८ ते २०१८ दरम्यान १४ कोटी २७ लक्ष रुपये पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक होता. यंदा मात्र तब्बल २८ कोटी रूपयांची पाणीपट्टी वसूल करुन हा उच्चांक मोडण्यात आला.कोट...पाणीवापर संस्था वाढवणे गरजेचेशेतकरी व अधिकारी असे सहभागी सिंचनाचे तत्व वापरून पाण्याची बचत करून ओलीताखालील क्षेत्र वाढविण्यासाठी लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यावर पाणीवापर सहकारी संस्था शेतकºयांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. लाभक्षेत्रात सध्या १३४ पाणीवापर संस्था कार्यान्वित असून या पाणीवापर संस्थेच्या सभासद शेतकºयांना जायकवाडीच्या पाण्याचा योग्य लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.चौकट...गेल्या दहा वर्षातील जायकवाडीची पाणीपट्टी वसुली२००८-०९ - १४ कोटी २७ लक्ष.२००९-१० - १२ कोटी ८२ लक्ष.२०१०-११ - १२ कोटी ६६ लक्ष.२०११-१२ - १३ कोटी ६२ लक्ष.१०१२- १३ - ०९ कोटी ६० लक्ष.२०१३-१४ - १० कोटी ९३ लक्ष.२०१४- १५ - १२ कोटी १० लक्ष.२०१५-१६ - ०८ कोटी ९५ लक्ष.२०१६-१७ - ०९ कोटी२८ लक्ष.२०१७-१८ - १२ कोटी ८३ लक्ष.२०१८- १९ - २८ कोटी ३४ लक्ष.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी