शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वर्षभरात कधी दुरुस्ती, तर कधी नादुरुस्ती, शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्ग कधी?

By संतोष हिरेमठ | Published: June 12, 2023 12:55 PM

दिवसभर वाहनचालकांची तारांबळ, हाकेच्या अंतरासाठी ५ कि.मी.चा वळसा

छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीसाठी शिवाजीनगर रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने रविवारी दिवसभर देवळाई, सातारा परिसरात ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना फटका बसला. ऐन गेटसमोर येऊन हाकेच्या अंतरासाठी जवळपास ५ कि.मी.चा वळसा मारून संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागली. या ठिकाणी भुयारी मार्ग कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे देखभाल- दुरुस्तीसाठी शनिवारी रात्री ९ वाजेपासून शिवाजीनगर रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा गेट बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार असल्याने नेहमीपेक्षा वाहनचालकांची वर्दळ कमी होती. मात्र, अनेकांना रेल्वे गेटच्या दुरुस्तीची माहिती नव्हती. त्यामुळे देवळाई, गारखेडा परिसरातून वाहनचालक या गेटपर्यंत येत होते. पण माघारी फिरून वाहनचालकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागली.

एनओसी मिळाली तर प्रश्न सुटेलराज्यात अनेक ठिकाणी रेल्वेतर्फे भुयारी मार्गांचे काम होत आहे. परंतु राजकीय श्रेयासाठी शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न आजही टांगून पडलेला आहे. कधी महानगरपालिका तर कधी जिल्हाधिकारी तर कधी सा. बां. विभाग हा प्रश्न जाणून-बुजून रेंगाळत ठेवल्याचे दिसत आहे. रेल्वे विभागाला जर या तीन विभागांकडून एनओसी मिळाली तर तत्काळ भुयारी मार्ग होईल. कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा - देवळाई जनसेवा कृती समिती

यापूर्वी शिवाजीनगर रेल्वेगेट कधी काय घडले?- ३० जून २०२२ रोजी एका ट्रकची रेल्वेगेटला धडक. दुरुस्तीसाठी ३ तास, रेल्वेगेट बंद.- ६ जुलै २०२२ रोजी मालवाहू वाहनाच्या धडकेने रेल्वेगेट पुन्हा नादुरुस्त.- १ ऑगस्ट २०२२ रोजी एका वाहनाची धडक. जवळपास ५ तास वाहतुकीवर परिणाम.- ११ मार्च २०२३ रोजी रेल्वेगेट नादुरुस्त, लोखंडी पाइप हाताने ओढून गेट उघडण्याची-बंद करण्याची रेल्वे कर्मचाऱ्यावर वेळ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी