शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दसरा-दिवाळी ठरली १२०० कोटींची; छत्रपती संभाजीनगरवासीयांकडून मनसोक्त खरेदी

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 20, 2023 5:17 PM

यंदा दिवाळी पहिल्या पंधरवड्यात आल्याने नागरिकांनी महिन्याचे सामान व दिवाळीचे सामान, अशी एकत्रित खरेदी केली.

छत्रपती संभाजीनगर : ‘दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा’ या वाक्प्रचाराची प्रचिती यंदा आली. दसरा व दिवाळी सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या उत्साहाच्या भरात नागरिकांनी तब्बल १२०० कोटींची नवीन खरेदी केल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या स्थानिक शाखेने दिली.

सर्वाधिक उलाढाल किराणा सामानातयंदा दिवाळी पहिल्या पंधरवड्यात आल्याने नागरिकांनी महिन्याचे सामान व दिवाळीचे सामान, अशी एकत्रित खरेदी केली. जिल्ह्यात एकूण उलाढालीपैकी १७ टक्के उलाढाल किराणा सामानात झाली असून, १८० कोटींचा किराणा विक्री झाला.

कोणत्या व्यवसायात किती उलाढाल?व्यवसाय टक्केवारी उलाढाल (रुपये)१) किराणा १७ टक्के १८० कोटी२) कापड १५ टक्के १५६ कोटी३) इलेक्ट्रॉनिक्स १० टक्के १२० कोटी४) वाहन बाजार १० टक्के १२० कोटी५) सोने-चांदी ८ टक्के ९६ कोटी६) फर्निचर ७ टक्के ८४ कोटी७) मोबाइल ९ टक्के १०८ कोटी८) भांडी बाजार ४ टक्के ४८ कोटी९) इलेक्ट्रिकल्स ४ टक्के ४८ कोटी१०) पेंटस् ३ टक्के ३६ कोटी११) कटलरी ४ टक्के ४८ कोटी१२) मिठाई ४ टक्के ४८ कोटी१३) फटाके २ टक्के २४ कोटी१४) अन्य ३ टक्के ३६ कोटी

१५ ते २० टक्क्यांनी वाढली उलाढालयंदा पावसाने मोठा फटका दिला. ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन, बसेस बंद यामुळे बाजारपेठेत उलाढालीला मोठा फटका बसेल, असे वाटत होते; पण शेवटच्या चार ते पाच दिवसांत मोठी उलाढाल झाली. मागील वर्षी दसरा-दिवाळीदरम्यान १०२० कोटींपर्यंत उलाढाल झाली. यंदा १२०० कोटीपर्यंत जाऊन पोहोचली. १५ ते २० टक्क्यांनी उलाढाल वाढली. तरी यात बांधकाम व्यवसायाची आकडेवारी नाही.-अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष (महाराष्ट्र, कॅट)

कोरोनानंतर परिस्थिती सुधारतेयकोविडच्या काळात व्यावसायिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. याची अनुभूती यंदा दसरा-दिवाळीदरम्यान झाली. आता लग्नसराईचे दिवस सुरू होत आहेत. यामुळे उलाढाल वाढत राहील.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

बांधकाम क्षेत्रात ५०० कोटींची उलाढालयंदा बांधकाम क्षेत्रासाठी दसरा ते दिवाळी हा काळ सर्वाेत्तम राहिला. लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार बांधकाम व्यावसायिक बंगले, अपार्टमेंट ते टाऊनशिप उभारत आहेत. मोठ्या फ्लॅटला पसंती मिळत आहे. मराठवाडाच नव्हे तर खान्देश, विदर्भातूनही लोक शहरात गुंतवणुकीसाठी घराचा पर्याय निवडत असल्याने दसरा ते दिवाळी दरम्यान बांधकाम क्षेत्रात ५०० कोटींची उलाढाल झाली.- विकास चौधरी, अध्यक्ष, क्रेडाई

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023AurangabadऔरंगाबादMarketबाजार