बाजारसावंगी : बाजारसावंगी ते येसगाव नंबर दोन या रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यातच रस्ता बनविला गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाजारसावंगी ते येसगाव नंबर दोन या रस्त्याच्या कामासाठी पस्तीस लाखांचा निधी मंजूर झाला. खड्ड्यात मुरुम भरण्यासाठीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास दिले. या रस्त्यावर ठेकेदाराने मुरुमाचा वापर करण्याऐवजी मातीचा वापर करून खड्डे बुजविण्याच्या कामातही बनवाबनवी केली आहे. त्यामुळे या मार्गावरून एखादे वाहन जाताच सर्वत्र धुळीचे लोळ पसरतात. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डांबराचा वापर कमी केला गेल्याने खड्ड्यातील खडी पुन्हा उखडली जात आहे. त्यामुळे या कामाचे अवघ्या एक महिन्यात तीनतेरा वाजले गेले आहेत. बाजारसावंगी ते येसगाव नंबर दोन या रस्त्याच्या कामात मुरुम न वापरता मातीयुक्त मुरुम वापरला गेला आहे. त्यामुळे येता-जाता धुळीचे लोळ उठत असून, खड्डे बुजविण्याचे कागदी घोडे नाचविले गेले.
फोटो :