- संतोष हिरेमठऔरंगाबाद : ई-दुचाकी आणि ई-कार गेल्या काही वर्षांत सर्वांना माहीत झाल्या आहेत. हायब्रीड कार... हा शब्द अनेकांनी कदाचित ऐकला नसेल. ई-वाहनांपाठोपाठ हायब्रीड कारदेखील शहरातील रस्त्यावर धावत आहेत. नुसत्या धावत नाहीत तर या हायब्रीड कारने ई-कारलादेखील ‘ओव्हरटेक’ केले आहे. औरंगाबादेत ई-कारपेक्षाही हायब्रीड कारची संख्या वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांऐवजी पर्यायी इंधनावरील वाहने रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यात ई-वाहनांची संख्या अलीकडे वाढत आहे. वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच हायब्रीड वाहनांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरात गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक कारपेक्षा हायब्रीड कार खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. हायब्रीड वाहनांची संख्या शहरात २ हजार ५७०पर्यंत पोहोचली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३९६ आहे.
काय असते हायब्रीड कारमध्ये?हायब्रीड कारमध्ये काही वाहने ही एका गतीपेक्षा जास्त वेगात चालविण्यात आल्यास, त्या पेट्रोल अथवा डिझेलवर चालत असतात. अशा वेळी वाहनातील बॅटरीही सोबत चार्ज होत असते. एकाचवेळी पारंपरिक इंधन आणि वीज या दोन वेगळ्या स्रोतांमुळे वाहन अधिक क्षमतेने चालते. म्हणजे जितकी गाडी चालते तितकीच ती चार्ज होत राहते, म्हणजे वेगळ्या बॅटरी चार्जिंगची गरजच उरत नाही. कमी इंधन वापरल्यामुळे या गाडीचे बाहेर टाकल्या जाणाऱ्या धुराचे प्रमाणही कमी असते.
विशिष्ट गतीनंतर बदलहायब्रीड वाहने ही विशिष्ट गतीनंतर इंधनावर चालतात. बॅटरीचा वापर थांबतो. वाहन इंधनावर चालत असल्याने बॅटरी चार्ज होते. वाहनामध्ये तशी यंत्रणा कार्यरत असते. हायब्रीड पेट्रोल आणि हायब्रीड डिझेल प्रकारात वाहने आहेत.-संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी.
औरंगाबादेत कारची संख्या वाहन प्रकार : २०२२ (आतापर्यंत) - एकूण वाहनेपेट्रोल / एलपीजी कार -६- २१९९ पेट्रोल सीएनजी कार-१५३३-३१६०ई-कार -३४४-३९६पेट्रोल हायब्रीड कार-४२५-१२४४डिझेल हायब्रीड कार-३-१३२६