शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पशुपालकांसाठी आले ई-गोपाला ॲप; ‘सर्जा-राजा’ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!

By विजय सरवदे | Published: December 15, 2023 2:42 PM

या ॲपद्वारे पशुपालकांना लसीकरणाचे अलर्ट, प्रजनन सेवांची उपलब्धता यासह उपचार अशा अनेक गोष्टींची माहिती एका क्लीकवर मिळणाार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पशुपालकांसाठी ई-गोपाला ॲप तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांची उपलब्धता, लसीकरणाचे अलर्ट, जनावरांच्या खरेदी-विक्रीची माहिती एक क्लिकवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपवर पशुपालकांना जनावरांचे टॅगिंगही करता येणार आहे.

काय आहे ई- गोपाला ॲप?केंद्र सरकारने पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ई-गोपाला ॲप काढले आहे. या ॲपद्वारे पशुपालकांना लसीकरणाचे अलर्ट, प्रजनन सेवांची उपलब्धता यासह उपचार अशा अनेक गोष्टींची माहिती एका क्लीकवर मिळणाार आहे.

जनावरांचे आधार कार्डजनावरांचा टॅगिंग क्रमांक म्हणजेच त्याचे ते आधार कार्ड असणार आहे. जनावरांच्या कानात पिवळा टॅग बसविला जातो. त्या टॅगवर १२ आकड्याचा क्रमांक असतो. टॅगिंगचा क्रमांक देताना जनावराच्या मालकाचे नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, गाव, संबंधित जनावराचे किती वेत झाली, त्या जनावरला केलेले लसीकरण, वैद्यकीय उपचार, खरेदी- विक्री आदी अनेक महत्त्वाच्या नोंदी केल्या जातात. त्यामुळेच टॅगिंग क्रमांकाला आधार कार्ड म्हटले जाते. पशुसंवर्धन विभागाकडून टॅगिंगच्या नोंदी भारत पशुधन ॲपवर केल्या जातात. जिल्ह्यातील ६ लाख ३३ हजार जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे.

जनावरांचे आजार-उपचार : या ॲपच्या माध्यमातून संबंधित जनावरावर कोणत्या आजारासाठी उपचार करण्यात आले, कोणते लसीकरण करण्यात आले, याची माहिती मिळणार आहे.

खरेदीदारांची माहिती : जनावरांची खरेदी- विक्री झाल्यास अगोदरच्या पशुपालकांकडून विकत घेणाऱ्या पशुपालकास ‘ट्रान्सफर’ अशी नोंद केली जाते.

सर्व नोंदी ठेवा मोबाइलवर : संबंधित जनावराच्या कृत्रिम रेतन, वेतानंतर जन्माला येणाऱ्या वासरांच्या नोंदी, लसीकरणाचे अलर्ट अशा अनेक माहिती या ॲपद्वारे मोबाइलवर मिळणार आहेत.

पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोटई-गोपाला ॲप हे पशुपालकांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वच पशुपालकांनी हे ॲप मोबाइलवर डाउनलोड करावे. या माध्यमातून आपल्या जनावरांच्या उपचार, लसीकरण, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांच्या (कृत्रिम रेतन, उत्तम प्रतीच्या वळूचे वीर्य, भ्रूण) माहितीसाठी अपडेट राहावे.- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी