जालना : विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरत असलेली ई-लर्निंग प्रणाली रोटरी क्लब आॅफ जालनाच्या वतीने १८५ शाळांना उपलब्ध करुन देण्यात आली असून, याचे लोकार्पण रविवारी बेजो शितल सीडस्च्या सभागृहात होत आहे.बजाज अॅटोचे सल्लागार तथा कमलनयन बजाज हॉस्पिटलचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत आहे. पोलिओ निर्मूलनाचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर रोटरी इंटरनॅशनलने निरक्षरात निर्मूलन कार्य हाती घेतले. रोटरी क्लब सेंट्रलने साक्षरता अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये १८५ ई-लर्निंग युनिट स्थापन केले. यात संगणक, प्रोजेक्टर, ध्वनी व्यवस्थेसाठी स्पीकर आणि आवश्यक त्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. ज्यामुळे शालेय अभ्यासक्रम आणि त्या व्यतिरिक्त इतर माहिती प्रोजेक्टरवर थेट पाहता येते. या सर्व युनिटचा एकत्रित लोकार्पण सोहळा रविवारी दुपारी ४.३० वाजता होत आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरीचे डॉ. नीलेश सोनी, सचिव वीरेंद्र देशपांडे, प्रकल्प प्रमुख नितीन काबरा, आदेश मंत्री यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ई-लर्निंग युनिटचा आज लोकार्पण सोहळा
By admin | Published: March 05, 2017 12:23 AM