शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

कानात इअरफोन अन् चपलेत आयफोन; पोलीस भरतीचा पेपर फोडणारा औरंगाबादेत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 3:14 PM

शनिवारी राज्यात कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली, यात पेपर लीक झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबादःकाल म्हणजेच शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एका उमेदवाराला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विकास परमसिंग बारवाल असे प्रश्न पत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. तो जालना येथील अंबड तालुक्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आयफोन आणि अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त केले आहेत. 

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या लालटाकी रोड परिसरातील केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर एका कक्षात सुपरवायझरला विकासकडे मोबाइल असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या कानात छोट्या आकाराचे इअरफोन्स असल्याचे आढळले. विकासने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला होता. तोफखाना पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

याशिवाय, औरंगाबादमधील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी शाळेच्या केंद्रात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. सोमनाथ विठ्ठल मोरे नावाच्या तरुणाने शर्टच्या आत एक टीशर्ट घातला होता. त्याला आतून पाकीट बनवून त्यात मोबाइल, मास्टरकार्ड म्हणजेच ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाइस बसवलेले होते. तर कानात ज्वारीच्या दाण्याएवढे इअरफोन लपवलेले होते. या तरुणालाही पोलिसांनी अटक केले आहे.

म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्याआज म्हाडाची परीक्षा होणार होती, पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण ताजे असताना, म्हाडा भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही असा सज्जड दमही दिला. 

"काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करुन त्यांनी याबाबत माहिती दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी