माजलगाव : श्री सिध्देश्वर विद्यालय हे विविध समाज उपयोगी व सामाजिक उपक्र मात सदैव अग्रेसर असते, त्याच अनुषंगाने वाढत्या प्रदुषणाला आळा घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या’ गणेश मूर्तीना फाटा देण्याच्या उद्देशाने पर्यावरण पुरक मातीच्या गणेशमूर्ती उत्कृष्ठ बनविण्याची शुक्र वारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून ५५० मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या असून याच मूर्तींची गणेशउत्सवात विद्यार्थी आपल्या घरी स्थापना करणार आहेत.दिवसेंदिवस विवीध कारणाने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. यात गणेश उत्सवाच्या काळात ‘प्लॅस्टर आॅफ पॅरीस’च्या मोठमोठ्या मूर्ती स्थापन्यांचा चढाओढ चालू झाला आहे. परंतू या प्लॅस्टर आॅफ पॅरसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचे अपयाकारक ठरत आहेत. त्या पाण्यात लवकर विरघळत नसून त्यामुळे पाणी दुषीत होवून ते पाणी माणसांना व जनावरांना पिण्यास अयोग्य होवून वेगवेगळ्या आजारास सामोरे जावे लागते. याला कुठे तरी थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्री सिध्देश्वर विद्यालयाच्या वतीने मागील चार वर्षापासून पर्यावरण पुरक अशा मातीच्या गणेशमुर्त्या बनवण्याची कार्यशाळा घेण्यात येते. यावर्षी त्या अनुषंगाने लातुर येथून १० पोते क्ले मातीचा वापर करून स्वत:च्या हाताने विद्यार्थींनीनी गणेशमूर्ती साकारल्या. याच गणेशमूर्त्या आपआपल्या घरी विद्यार्थी स्थापना करतात व पर्यावरणास पोषक अशा गणेशमूर्त्या स्थापन करण्याचा संदेश देवू पाहत आहेत. शुक्रवारी झालेल्या या कार्यशाळेत विद्यालयाच्या १ ली ते १० वी. या वर्गातील ५५० वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेवन ५५० गणेशमूर्त्या साकारल्या. मागील चार वर्षापासून चित्रकला विभागप्रमुख उध्दव विभुते यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येते.या अभियानाचे उद्घाटन प्रकाश दुगड, प्रेमिकशोर मानधणे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक मंजुळदास गवते, सुरेखा रत्नपारखी, राजकुमार वखरे, गणेश कुलकर्णी, स्मिता लिमगांवकर, गुरूदत्त महामुनी, नवनाथ सांगुळे, यांची उपस्थिती होती. या अभियानात १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या मातीच्या गणेशाच्या मुर्त्यांचे प्रदर्शन विद्यालयाच्या प्रागंणात शनिवारी सकाळी भरवण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्याने साकारलेल्या आकर्षक गणेशमूर्ती पाहून अनेकाना त्यांच्या कलेचे दर्शन घडले. यामध्ये १ ली ते ४ थी या गटातून शितल रत्नाकर कुलथे हि प्रथम आली तर ५ वी वर्गातून प्रतिक संजय दैठणकर, ६ वी वर्गातून आदिती, ७ वी वर्गातून ची रेणुका कासट, ८ वी वर्गातून पृथा पाठक, ९ वी वर्गातून कैलास, १० वी दुर्गेश राठोड यांचा प्रथम क्र मांक आला. (वार्ताहर)
सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘इको-फ्रेंडली’ गणेश
By admin | Published: September 14, 2015 11:25 PM