लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील घरगुती, व्यावसायिक आणि उद्योजक ग्राहकांकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची, तर परिमंडळांतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत कृषिपंपधारकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या आठवड्यात शहरातील थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. याशिवाय कृषिपंपांची थकबाकी न भरणाºया ग्राहकांच्या विद्युत वाहिन्याच बंद करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण ६७४ वाहिन्या असून, यापैकी ५० टक्के वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. बिल न भरणाºया कृषिपंपधारकांना वीजपुरवठा करणाºया वाहिन्या बंद करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाºया एकूण १६,००० रोहित्रांपैकी ७ हजार ९१४ बंद करण्यात आले आहेत. यामध्ये २८० रोहित्र नादुरुस्त आहेत. शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्रांची दुरुस्ती केली जाणार नाही. सध्या १ लाख ७ हजार ३२९ कृषिपंप यामुळे बंद पडले असून, यांच्याकडे ३९९ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे.शहरात १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले २,२५० ग्राहक असून, त्यांच्याकडे ४३ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये घरगुती वापर असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या आठवड्यात सर्व शाखा अभियंत्यांना बिल दुरुस्ती, वसुली, वीजपुरवठा खंडित करून मीटर काढून आणण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन अधिकाºयांवरच कारवाईथकबाकी वसुलीमध्ये कमी पडलेले शहराचे कार्यकारी अभियंता अर्शद पठाण व छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर या दोघांच्या बदल्या दुसºया जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. तथापि, शहर क्रमांक १ व शहर क्रमांक २ मध्ये एकूण ८ उपविभाग आहेत. या उपविभागांत थकबाकी वसुलीचे काम उत्कृष्ट झाले आहे काय, या प्रश्नावर गणेशकर म्हणाले की, उर्वरित उपविभागांमध्ये वसुली चांगलीच आहे, असे म्हणावे लागेल. तथापि, या आठ उपविभागांपैकी एकट्या छावणी उपविभागामध्ये ६० हजार ग्राहक संख्या आहे. उर्वरित उपविभागांमध्ये कुठे २०, तर कुठे ३० अशी ग्राहक संख्या असताना मनुष्यबळ मात्र सर्व ठिकाणी सारखेच आहे. असे असताना मुख्य अभियंत्यांनी एकट्या छावणी उपविभागाच्या अधिकाºयावर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कर्मचाºयांच्या वतीने करण्यात आला आहे.
महावितरणला आर्थिक विवंचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:10 AM