औरंगाबाद : शहरातील काही नामवंत उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांवर ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ईडीने सात ठिकाणी छापेमारी सुरु केली. शहरातील काही उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर असल्याचे बोले जात आहे.तसेच या छापेमारी मागे समीर वानखेडे कनेक्शन असल्याची चर्चा देखील आहे.
मुंबई आणि नागपूरनंतर आता औरंगाबाद ईडीच्या रडारवर आहे आहे. ईडीच्या पथकात एकूण १२ अधिकारी आहेत. स्थानिक पातळीवर या छापेमारीची कसलीही माहिती नव्हती. दुपारी अचानक शहरातील सात ठिकाणी कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले. शहरातील काही उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी झाली. यातील एक उद्योजक राजकीय पक्षाशी संबंधित आहे. दरम्यान, ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, तर एका उद्योजकाची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच छापेमारीतून काय निष्पन्न होते याकडे आता औरंगाबादकरांचे लक्ष आहे.