कॅम्पस क्लब आणि डीएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काबरा यांनी नव्या शैक्षणिक धाेरणानुसार शिक्षणक्षेत्रात येणारे बदल याविषयी विद्यार्थी व पालकांना सखोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक धाेरणाविषयी सांगताना ते म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्ये अभ्यासक्रमातच सामाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता घोकंपट्टी टाळून विषय समजून घेण्याला आणि ज्ञानार्जन करण्याला आपसूकच प्रोत्साहन मिळेल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्यात आल्याचे काबरा यांनी सांगितले.
चौकट :
मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे मैदानी खेळ
नकार ऐकण्याची, परीक्षेतील अपयश पचविण्याची मुलांना सवय राहिलेली नाही. यामुळे ते फार लवकर खचून जातात. हे टाळण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना मैदानी खेळाची सवय लावा, खेळांमधला जय-पराजय म्हणजे एकप्रकारे मानसिक आरोग्यासाठी असणारे लसीकरणच आहे, असा विशेष मुद्दाही काबरा यांनी मांडला.
चौकट :
१. डीएफसीचा ॲडव्हान्स फाउंडेशन काेर्स
शालेय स्तरावरील आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेण्यासाठी डीएफसीतर्फे ॲडव्हान्स फाउंडेशन कोर्स तयार करण्यात आला आहे. सध्या इयत्ता ८ वी व ९ वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अतिशय उपयोगी आहे. दि. १ मे पासून सुरू होणाऱ्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या फाउंडेशन कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
२. डीएफसीची वैशिष्ट्ये-
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी विशेष हेल्पलाईन सिस्टीम.
- प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सेल्फ स्टडी चार्ट.
- सुनियोजित पद्धतीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे रेकॉर्ड.
-पीअर ट्युटरींग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जो धडा पक्का असेल, त्याने तो इतर विद्यार्थ्यांनाही समजावून सांगायचा.
सूचना
- डीएफसी आणि कॅम्पस क्लबचा लोगो घेणे.
- गाेविंद काबरा यांचा फोटो घेणे.