शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:36 PM

वाळूज येथे साडे पाचकोटी रुपर्य रुपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

वाळूज महानगर : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरएसटीसीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.वाळूज येथे साडे पाचकोटी रुपर्य रुपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी क्लस्टरमधून वाळूज परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. चंद्रकांत खैरे, जि.प.अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, आ. संजय शिरसाठ, जि.प.सदस्य रामदास परोडकर, सरपंच पपीनकुमार माने, सभापती ज्योती गायकवाड, माजी सभापती मनोज जैस्वाल, मंजुषा जैस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गिते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके, उपजिल्हा प्रमुख कृष्णा पा.डोणगावकर, उपस्थित होते.

डोणगावकर म्हणाल्या की, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. वाळूजच्या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व इतर सुविधाही लवकरच उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याच बरोबर जोगेश्वरीत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डोणगावकर यांनी सांगितले.

या प्रसंगी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.दत्तात्र्य घोलप, डॉ.सुंदर कुलकर्णी, डॉ.लड्डा, डॉ.गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, सदस्य सचिन काकडे, नंदकुमार राऊत, चेअरमन सर्जेराव भोंड, ज्ञानेश्वर देसाई, उत्तम बनकर, अविनाश गायकवाड, लताताई ईले, पद्माबाई गवांदे, पोपट बनकर, अनिल साळवे, हापीज पटेल, मुकेश बोहरा, अमोल लहकरे, काकासाहेब चापे, पारसचंद साकला, प्रवीण दुबिले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :WalujवाळूजHealthआरोग्य