शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेना फोडण्याच्या प्रयत्नांना वेग! ६ माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी फोडले

By मुजीब देवणीकर | Published: June 27, 2024 7:44 PM

१९८८ पासून २०१५ च्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच दबदबा राहिला.

छत्रपती संभाजीनगर : मुंबईनंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात भरघोस प्रतिसाद मिळाला. ठाकरे यांचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी शिंदेसेना सरसावली आहे. आतापर्यंत उद्धवसेनेचे २७ पैकी ६ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले. पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक पदाधिकारीही गेले. आणखी काही पदाधिकारी, माजी नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, विधानसभेपूर्वी त्यांचे मन वळविणे सुरू आहे. मात्र, निष्ठावंत अजिबात भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास उद्धवसेनेला आहे.

शिवसेनेचा दबदबा१९८८ पासून २०१५ च्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच दबदबा राहिला. शिवसेना म्हणजे धगधगती ‘मशाल’ असे समीकरणच महापालिकेच्या राजकारणात बनले होते. २०१५ च्या मनपा निवडणुकीत ‘धुनष्यबाण’ चिन्हावर २७ नगरसेवक निवडून आले. ५ शिवसेना बंडखोर, अपक्षांनी नंतर पाठिंबा दिला. महापालिकेत एकट्या सेनेकडे ३२ नगरसेवक होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले. सर्वांत अगोदर संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी महापौर विकास जैन, गजानन बारवाल यांनी प्रवेश केला. अलीकडेच माजी सभागृहनेता गजानन मनगटे यांनीही शिंदेसेनेचा झेंडा हाती धरला. याशिवाय सातारा-देवळाई, पडेगाव, मिटमिटा, बजाजनगर आदी भागातील शेकडो पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. संघटन म्हणून पश्चिम आणि मध्यमध्ये उद्धवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय किंवा त्यांना मानणारे अधिक आहेत.

फोडाफोडी अधिक होणारपूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांना डोळ्यासमोर ठेवून फोडाफोडी व्यापक प्रमाणात करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेच्या या प्रयत्नांना किती यश येईल, हे लवकरच कळेल.

निष्ठावंत अजिबात जाणार नाहीतशिवसेना एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा क्षणभरही डोळ्यांसमोर आला तरी एकाही निष्ठावंताची उद्धव साहेबांना या परिस्थितीत सोडण्याची हिंमत होणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी उद्धवसेना एकसंघ राहील.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर, उद्धवसेना

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना