शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात

By योगेश पायघन | Published: January 24, 2023 7:45 PM

उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते.

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रातील दुर्मीळ हस्तलिखितांच्या दालनातील साडेआठ लाख पानांना डिजिटलायझेशनची आस लागली आहे. रामायण, महाभारत, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, उपनिषद, पुराण, पोथ्यांच्या २४१४ हस्तलिखितांच्या संग्रहासाठी स्वतंत्र दालन २०१३ मध्ये झाले. मात्र, ५ भाषा ११ लिप्यांतील या अमूल्य ठेव्याला राष्ट्रीय वारसा संरक्षण, संवर्धन, डिजिटलायझेशन हब बनवण्यासाठी ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे.

उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. महानुभाव संप्रदाय हा मराठी भाषेच्या आरंभीचा एक महत्त्वाचा संप्रदाय असल्याने या हस्तलिखितांना सामाजिक महत्त्व प्राप्त होते. शके १४०० ते १७०० व्या शतकातील वर्णन असलेल्या हस्तलिखितात महाराष्ट्रातील इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत उर्दू, पंजाबी भाषांतील हस्तलिखितांमध्ये देवनागरी, सकळ, मोडी, सुंदरी, अंक इ. ११ लिप्यांचा समावेश आहे. विशेषज्ञांकडून या पानांचे रासायनिक संवर्धन करून चिकटलेली पाने वेगळी करून त्यात विशिष्ट प्रकारची पाने ठेवावी लागतील. त्यानंतरच त्याचे स्कॅनिंग शक्य होणार असल्याचे ज्ञान स्रोत केंद्राकडून सांगण्यात आले.

कुलगुरूंचे प्रयत्न सुरूइतिहास विभागास यापूर्वी मिळालेला निधी अखर्चित असल्याने ‘काळ्या यादी’त होता. या यादीतून काढून नवा प्रकल्प केंद्राकडून मिळवण्यासाठी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यासंदर्भात सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिवांशीही त्यांनी चर्चा केली. हे काम केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानानंतरच शक्य होईल.

असा आहे समृद्ध ठेवा...एकूण हस्तलिखिते -३४१४सचित्र हस्तलिखिते -२४शीलालेख ठसे -९२मराठी शीलालेखांचे ठसे -१८पुरातन वास्तू -४८सनद (पत्रे) -३९

डिजिटलायझेशन गरजेचेइतिहासातील अमूल्य हस्तलिखितांचा ठेवा ज्ञान स्रोत केंद्रातील स्वतंत्र दालनात आहे. या वारशाला अधिक काळ जतन, संवर्धन करण्यासाठी त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. निधी मिळाल्यास ज्ञान साधक, संशोधकांना या ज्ञानभांडाराचा लाभ घेता येईल.-डाॅ. धर्मराज वीर, संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

काय आहे प्रस्ताव ?जतन, संवर्धन आणि डिजिटलायझेशन कार्य - १ कोटी रु.हस्तलिखितांसाठी आर्ट गॅलरीचा विकास आणि दुर्मीळ पुस्तके- २.५ कोटी रु.संवर्धन आणि डिजिटलायझेशन उपकरणे - ५० लाख रु.फर्निचर -५० लाख रु.मनुष्यबळाचा खर्च -१२ लाख रु.एकूण अंदाजपत्रक -४ कोटी ६२ लाख रु.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण