शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उपलब्ध आठ लाख लिटर; गरज ४ लाखांची; तरीही कायम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:36 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते.

ठळक मुद्देविद्यापीठातील पाणीबाणी : अतिरिक्त विद्यार्थी, पाण्याची चोरी अन् अपव्यय रोखण्याची गरज

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते. ८ लाख लिटर पाणी उपलब्ध असताना गरजेचे ४ लाख लिटर वजा केले, तर उरलेले ४ लाख लिटर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.विद्यापीठातील विविध विभाग, वसतिगृहे आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांमध्ये पाणीटंचाईचा प्रकार वारंवार घडतो आहे. विद्यापीठातील पाण्याची उपलब्धता मोठी आहे. हे पाणी वसतिगृहे, विभागांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दररोज भरले जाते; मात्र वापर आणि पाण्याच्या चोरीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली. विद्यापीठातील विभागांमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८०० विद्यार्थी (कागदोपत्री) वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १३५ लिटर पाणी प्रतिदिन दिले पाहिजे, असा नियम आहे. यानुसार १८०० विद्यार्थ्यांना २ लाख ४३ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर विभागांमध्ये शिक्षण घेणाºया ५ हजार विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि विभागातील स्वच्छतागृहांसाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशी ४ लाख लिटर पाण्याची विद्यापीठात गरज असल्याची माहिती स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र विद्यापीठातील १८ विहिरी, १४ कुपनलिका आणि महापालिकेद्वारे दररोज ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. ही आकडेवारी वसतिगृह, विभाग आणि प्रशासकीय इमारतींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये टाकण्यात येणाºया दररोजच्या नोंदीवरून काढलेली आहे.नासाडीसह चोरी थांबविण्याची आवश्यकतावसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या वसतिगृहांमध्ये उपलब्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते. मनसोक्त आंघोळ करणे, स्वच्छतागृहांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यामुळेही पाण्याच्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. याशिवाय विविध वसतिगृहांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. विद्यापीठाशेजारील परिसरात राहणारे विद्यार्थी, रहिवासी पिण्याचे पाणी जारमध्ये भरून घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थीही सकाळी वसतिगृहातील मित्रांकडे येऊन आंघोळी करून जातात, असेही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तसेच वसतिगृहात कागदोपत्री असलेल्या आकडेवारीपेक्षा तिप्पट विद्यार्थी वास्तव्याला असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.नियंत्रण कोण ठेवणारविद्यापीठातील वसतिगृहे, विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर मालमत्ता विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसतिगृहे, विभागांमधील पाण्याच्या टाक्या भरून देतात; मात्र त्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. यामुळे प्रत्यक्ष वापर करणाºया पाण्याची काटकसर, चोरीला जाणारे पाणी थांबविणे आणि अतिरिक्त वसतिगृहात येणारे आणि राहणाºया विद्यार्थ्यांना कोण अडवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पाण्याची उपलब्धता१८ विहिरी आणि १४ कूपनलिका- ६ लाख लिटर पेक्षा अधिकमहापालिकेचा जलकुंभ - २ लाख लिटर (एक दिवसाआड)पाण्याची गरज - प्रतिविद्यार्थी १३५ लिटर (वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड) कु ल शब्द(52)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड)पाण्याची सतत टंचाई होत असल्यामुळे बैठक घेऊन आढावा घेतला. विद्यापीठात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. विविध विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे असल्याचे दिसून आले. पाण्याच्या अतिवापरासह समन्वयाचा अभाव दिसून आला. विद्यापीठाने एक स्वतंत्र अतिरिक्त टँकर खरेदी केले आहे. जेथे पाणी कमी पडेल, तेथे पाणी दिले जाईल.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

 

टॅग्स :universityविद्यापीठWaterपाणीAurangabadऔरंगाबाद