बीड : जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरून सर्व तालुक्यांमध्ये आठ हजार क्वींटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण दोन हजार १०० स्वस्त धान्य दुकानांवरून साखरेचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले. तालुक्यातील गोदामावरून साखरेचे वाटप केलेले असल्यामुळे दुकानदारांनी मंजूर असलेल्या परवान्यानुसार संबंधित गोदामावरून साखर उचलली आहे. महागाईच्या काळात गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी साखरेचे नियतन मंजूर करून तात्काळ स्वस्त धान्य दुकानांवर साखर पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)४ बीड जिल्हयातील २ हजार शंभरच्या जवळपास स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुकानिहाय साखरेचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये बीड १ हजार ८८८ क्विंटल, गेवराई-११२६, माजलगाव- ४३०, आंबाजोगाई-५१५, केज- ८७४, पाटोदा- ३९८, आष्टी- ७०२, धारूर- ५३१, परळी- ७८३, वडवणी- ३४३, शिरूर कासार- ४४४ क्विंटल या प्रमाणे साखरेचे वाटप करण्यात आले.