लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. शेतकºयांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे शेतकºयांचा अवमान झाला म्हणून त्यांच्या विरोधात जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.जाफराबाद न्यायालयाने एक महिन्यापूूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याविषयी समन्स बाजवले होते. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. अॅड. रामेश्वर अंभोरे यांच्यामार्फत जामीनअर्ज दाखल केला. पंधरा हजारांच्या जमानत रकमेवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.जामीन मिळाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खडसे म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. एक वेळ शेतकºयांनी आपला मोबाईल रिचार्ज नाही केला तरी चालेल; परंतु त्यांनी वीज बिल पहिले भरावे. तेव्हाच आपण चांगले पीक घेऊन उत्पादन घेऊ शकू, असा माझा म्हणण्याचा उद्देश होता.
एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:02 AM