शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

शिंदे गटाचा नगराध्यक्ष होता होता राहिला; 'मुक्ताईनगर'ची निवडणुक प्रक्रिया खंडपीठाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 4:16 PM

‘नगरसेवकामधून’ निवडीचा कार्यक्रम खंडपीठाने केला रद्द, ‘थेट जनतेमधून’ निवडीचा कायदा शिंदे सरकारने बदला आहे.

औरंगाबाद :जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष पदाच्या शुक्रवारी (दि.२२) होणाऱ्या निवडणूकीचा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपंकर दत्ता आणि न्या. रविंद्र व्ही. घुगे यांनी शुक्रवारीच रद्द केला. निवडणूक झालीच तर ती अवैध समजावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. परिणामी नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज भरलेल्या शिंदे गटाच्या नगरसेवकास मुक्ताईनगरचा नगराध्यक्ष होण्याची संधी हुकली.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ जुलै २०२२ ला जाहीर केलेल्या आजच्या निवडणूकीच्या कार्यक्रमास अनुसूचित जमाती प्रवगार्तील प्रा. छाया ठिंगळे यांनी ॲड. गोविंद कुलकर्णी यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी युक्तीवाद केला.

विद्यमान नगरसेवकांमध्ये पियुष महाजन हे एकमेव अनुसूचित जमातीचे नगरसेवक आहेत. केवळ त्यांनीच नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन फॉर्म भरला होता. त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता होती. महाजन हे शिंदे सरकारला समर्थन देणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पहिला नगराध्यक्ष मुक्ताईनगर येथे निवडला जाण्याची शक्यता होती, ती संधी आता मावळली आहे.

काय होते प्रकरण ?२०१९ ते २०२३ या कालावधीसाठी ‘थेट जनतेमधून’ भाजपकडून नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या नजमा तडवी यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी अपात्र घोषित केले होते. तेव्हापासून उपनगराध्यक्ष मनीषा प्रवीण पाटील या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. दरम्यान, नगराध्यक्ष ‘नगरसेवकांमधून ’ निवडण्याबाबत १४ मार्च २०२० ला शासन निर्णय जाहीर झाला. त्याअनुषंगाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ जुलै २०२२ रोजी मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, विद्यमान शिंदे सरकारने १४ जुलै रोजी ‘नगरसेवकांमधून ’ नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द करुन कायद्यात दुरुस्ती केली. पुनश्च ‘थेट जनतेमधून’ नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घोषित केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नगरसेवकांमधून ’ नगराध्यक्ष निवडीचा घोषित केलेला कार्यक्रम कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे तो रद्द करावा, अशी विनंती याचिकाकर्तीने केली होती. शासनातर्फे सरकारी वकील डी. आर. काळे आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. अजीत कडेठाणकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादJalgaonजळगावElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदे