शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
2
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
3
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
4
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
6
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
7
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
8
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
9
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
10
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
11
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
12
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
13
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
14
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
15
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
16
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
17
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
18
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
19
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
20
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

शिंदेंनी बंडातील साथीदार आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी; पैठणमधून खासदार पुत्र मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 1:36 PM

छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी, कन्नडबाबत पेच कायम

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेने (शिंदे गट) विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी रात्री ११:३० वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांसह व खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचा समावेश आहे. यासोबतच मराठवाड्यातील अन्य पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

महायुतीतील भाजपने पहिली यादी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी घोषित करतील, असे त्यांचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले होते. त्यानुसार रात्री उशिरा शिवसेनेने पहिली यादी एक्स या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून तर शिवसेना प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांना औरंगाबाद पश्चिममधून (अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव), औरंगाबाद मध्य मतदार संघातून आ. प्रदीप जैस्वाल व वैजापूरमधून आ. रमेश बोरनारे यांना पुन्हा संधी देण्यात आली. खासदार संदीपान भुमरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

कन्नडचा पेच कायमकन्नड विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेकडून केतन काजे आणि भरत राजपूत इच्छुक आहेत. भाजपच्या संजना जाधव यादेखील तयारी करीत आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष कन्नडवर दावा करीत आहेत. कन्नडची उमेदवारी जाहीर न झाल्याने कन्नड मतदारसंघाचा पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील तीन औरंगाबाद पूर्व, गंगापूर व फुलंब्री मतदार संघातून उमेदवारांची घोषणा केलेली आहे. जिल्ह्यातील ९ मतदारसंघापैकी भाजप व शिंदे सेनेने मिळून ८ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. आता फक्त कन्नड कुणाच्या वाट्याला जातो याकडे लक्ष लागून आहे.

जालन्यातून खोतकर यांना उमेदवारीमराठवाड्यातील नांदेड उत्तरमधून बालाजी देवीदास कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतून संतोष लक्ष्मण बांगर, जालना मतदारसंघातून माजी मंत्री अर्जुन पंडितराव खोतकर, उमरगा (धाराशिव) येथून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले तर परंडा मतदारसंघातून विद्यमान मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमpaithan-acपैठणjalna-acजालनाumarga-acउमरगाparanda-acपरांडाkalamnuri-acकळमनुरीnanded-north-acनांदेड उत्तर