शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

By admin | Published: February 21, 2017 10:53 PM

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़ लोकसहभागातून पाणलोटाची कामे करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र परंड्यासह कळंब आणि भूम तालुक्यात दिसून येत आहे़ या स्पर्धेत या तीन तालुक्यातील २४२ गावांचा समावेश आहे़‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या माध्यमातून सत्यजीत भटकळ या निर्मात्याने सद्यस्थितीतील समाजासमोर असलेले अनेक प्रश्नांची मांडणी केली़ विशेष म्हणजे अमिर खान या मालिकेचा केंद्रबिंदू होता़ त्याच्या लोकप्रियतेमुळे या मालिकेबरोबरच या मालिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही गांभिर्याने चर्चा सुरू झाली़ लोकांचा प्रतिसाद पाहून भटकळ यांच्याबरोबरच अमिर खान यांनीही हा विषय पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केले़ त्यातूनच पाणी फाऊंडेशनची स्थापना झाली़ अमिर खान सोबत त्यांची पत्नी किरण रॉय ही या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, या संस्थेने मागील वर्षी अमरावती, सातारा आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोटाचे काम हाती घेतले़ बीडमध्ये अंबाजोगाई, साताऱ्यात कोरेगाव तर अमरावतीतील वरूड तालुक्यात श्रमदानातून पाणलोट विकास, माथा ते पायथा अशी कामे करण्यात आली़ तब्बल ११६ गावात पाणलोटाची कामे करून घेण्यात या फाऊंडेशनला यश आले़यावर्षी या फाऊंडेशनने मराठवाड्यातील दहा तालुक्यांसह राज्यातील तीस तालुक्यात याच पध्दतीने कामे करण्याचा संकल्प केला़ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दहा, विदर्भातील दहा तर मराठवाड्यातील दहा अशी राज्यातील तीस तालुक्यातील २०२४ गावे निवडली असून, तेथे पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे़ याबरोबरच ग्रामसभेतही ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत माहिती देऊन वॉटर कॅप स्पर्धेत सहभागी होण्याचे ठराव घेण्यात आले आहेत़ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ पैकी ६३, कळंब तालुक्यातील ९४ पैकी ९४, भूम तालुक्यातील ९४ पैकी ८५ गावांनी या वॉटर कॅप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे़ तीन तालुक्यातील एकूण २४२ गावांचा समावेश आहे़ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावात पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे़ या टीमला अंबाजोगाई येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ आजवर परंडा व भूम तालुक्यातील प्रत्येकी एक टीम प्रशिक्षणासाठी गेली आहे़ तर कळंब तालुक्यातील दोन टीम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पाच जणांमध्ये एक वॉटस्अ‍ॅप वापरणारा निवडण्यात आला असून, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जनजागृती केली जाणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांनी गावातील नागरिकांना प्रशिक्षित करावयाचे आहे़ वॉटर कॅप स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे या या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे़ यात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला २० लाख तर तृतीय येणाऱ्या गावाला २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ त्याशिवाय तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या गावाला १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे़ एकूणच या गावातील नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानातून होणाऱ्या या कामांमुळे गावा-गावातील पाणीटंचाईवर कायम मात करण्यात यश येणार असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी गावा-गावातील ग्रामस्थ कामाला लागले आहेत़(प्रतिनिधी)