वाळूज महानगर: जालना येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी औरंगाबाद ग्रामणी जिल्हा कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा तीसगाव येथे ८ व ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे तीगावात रविवारी कुस्ती पे्रमींना नामांकित मल्लांच्या दंगलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
महाराष्ट राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्य व महाराष्ट केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबाद ग्रामणी जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा तीसगाव येथे होणार आहे. औरंगाबाद जिल्हा तालिम संघाच्या वतीने ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येत आहे.
माती व गादी या दोन्ही विभागात होणाºया राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ व ९७ किलो वजनी गटात व महाराष्ट केसरी स्पर्धेसाठी ८६ ते १२५ किलो वजनगटात ही स्पर्धा होणार आहे. ही निवड चाचणी स्पर्धा तीसगाव येथे होणार आहे. शनिवार ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत आलेल्या मल्लांचे वजन घेण्यात येणार आहे.
त्यानंतर रविवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यातील विजेते मल्ल जालना येथे होणाºया स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील मल्लांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कुस्ती संघाचे सचिव प्रा. नारायणराव सिरसाट, पै. पर्वत कसुरे, पै. हरिसिंग राजपूत, पै. मिठ्ठलाल तरैय्यावाले आदींनी केले आहे.
रविवारी रंगणार दंगल ..तीसगाव येथे रविवारी औरंगाबाद ग्रामीण जिल्हा संघाची निवड स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. एकापेक्षा एक सरस मल्ल सहभाग नोंदविणार असल्याने कुस्तीच्या आखाड्यात मल्लांच्या डाव-प्रतिडावामुळे दंगलीला चांगलाच रंग येणार आहे. नामांकित मल्लांच्या कुस्ती खेळाचा आनंद तीसगावसह परिसरातील कुस्ती प्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. स्पर्धेसाठी तीसगाव येथे जय्यत तयारी केली जात आहे.