बँकेच्या संचालक निवडीसाठी २१ मार्च रोजी मतदान झाले होते. २२ मार्च रोजी निकाल जाहीर झाला होता. शेतकरी विकास पॅनलचे १४ तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे पाच संचालक निवडून आले. एक संचालक स्वतंत्रपणे निवडून आला.
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत एकापेक्षा अधिक नावे आल्यास आवाजी पद्धतीने किंवा हात वर करून या पदांची निवड होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितले. याच वेळी दोन स्वीकृत सदस्यांचीही संचालक मंडळ निवड करू शकेल.
शेतकरी विकास पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांचे नाव पूर्वीपासूनच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. मला काही अडचण नाही, परंतु शेवटी निर्णय संचालक मंडळाचा असतो, असे यासंदर्भात नितीन पाटील यांनी सांगितले.
नितीन पाटील यांच्या व्यतिरिक्त या पदावर कोणी दावा सांगू शकतो का व तसे राजकारण घडून येईल का याकडेही बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.