शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

'किरकोळ त्रुटींचे अर्ज बाद', राज्यात मतदार नोंदणीतील ढिसाळपणावर निवडणूक विभागाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 6:28 PM

मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना केल्या सूचना

- विकास राऊत

औरंगाबाद : राज्यात मतदार नोंदणीचा सुरू असलेला कार्यक्रम वाऱ्यावरच्या वरातीप्रमाणे राबविला जात असल्याचे आढळल्यामुळे राज्य मुख्य निवडणूक विभागाने या ढिसाळ प्रकरणाबाबत ताशेरे ओढले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन मतदार नोंदणी कार्यक्रम पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

आळसावलेल्या यंत्रणेने खातरजमा न करता अनेक अर्ज बाद केल्यामुळे मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांतील सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नोंदणी अधिकाऱ्यांनी बूथ लेव्हल ऑफिसरच्या अहवालानुसारच अर्ज बाद करण्याचा निर्णय घ्यावा, असे निवडणूक विभागाने म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर मतदारयादी, नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या मोहिमेतील एईआरओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ पातळीवरील १९ हजार ४०० मतदारांचे अर्ज परीक्षणासाठी ईआरओ-नेटमध्ये विशेष पडताळणीसाठी घेतले. यातील बहुतांश अर्ज बीएलओने न पाहताच निकाली काढलेले असल्याचे निदर्शनास आले. अपूर्ण आणि पार्ट-४ नसल्यामुळे अर्ज नाकारले आहेत, तसेच रहिवासी, आधार कार्ड सादर केलेले अर्जदेखील नाकारले आहेत. कागदपत्रे सादर करूनही अर्ज नाकारण्याचे कारण काय, ही बाब स्पष्ट झालेली नाही, तसेच विवाहाचा दाखला, चुकीचा मोबाइल क्रमांक, किरकोळ त्रुटी असलेल्या अर्जांबाबत निवडणूक विभागाच्या यंत्रणेने काहीही परिश्रम न घेता अर्ज बाद केले आहेत.

निवडणूक विभागाने काय म्हटले आहे पत्रात?नवमतदारांच्या किंवा इतर कारणाने आलेल्या अर्जांच्या त्रुटी दुरुस्त करणे शक्य होते; परंतु त्या केलेल्या नाहीत. अर्जदारास त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिलेली दिसत नाही. जी कागदपत्रे कमी आहेत, त्याबाबत अर्जदारास सूचना केलेली आढळत नाही. नोंदणीसंदर्भातील आलेल्या अर्जांबाबत बीएलओच्या मंजुरी अहवालाच्या आधारे निर्णय घ्यावा. जी कागदपत्रे कमी आहेत, त्यासाठी अर्जदाराला सुनावणीसाठी बोलावणे गरजेचे आहे. अनेक त्रुटी बीएलओ पातळीवर दुरुस्त झाल्या पाहिजेत, असे राज्य निवडणूक विभागाचे उपसचिव ए.एन. वळवी यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद