शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

औरंगाबाद आणि जालन्यात मतदान प्रक्रियेसाठी आयोगाची यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:17 PM

जिल्हा प्रशासन, पोलीस, सीआयडीची यंत्रणा तैनात

ठळक मुद्दे २०२१ मतदान केंद्रे औरंगाबादेत तर १ हजार ४ मतदान केंद्रे जालना लोकसभेसाठी आहेत.

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती रविवारी सायंकाळी एका संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांची यावेळी उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, २३ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. उमेदवार प्रतिनिधींसमक्ष अभिरूप मतदान होईल. ७ वा. मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. १८ लाख ८६ हजार २८३ मतदार औरंगाबाद तर ९ लाख ३१ हजार ४०४ मतदार जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. २०२१ मतदान केंद्रे औरंगाबादेत तर १ हजार ४ मतदान केंद्रे जालना लोकसभेसाठी आहेत. ३७०० कंट्रोल युनिट, ७ हजार ३६९ बॅलेट युनिट, ३ हजार ९७४ व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेसाठी लागतील. ११६२ बॅलेट, ५३५ कंट्रोल युनिट आणि ७७४ व्हीव्हीपॅट आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास ते २५ मिनिटांत बदलून मिळण्यासाठी व्यवस्था केल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. 

व्होटर स्लीपचे वाटप पूर्ण झाले असून, ११ विविध प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. व्होटर स्लीप फक्त मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी ग्राह्य धरली जाईल. ३५०० स्वयंसेवक, १८ हजार ३११ दिव्यांग मतदारांसाठी ३०० रिक्षा नि:शुल्क सेवा देणार आहेत. यासाठी बीएलओंशी संपर्क करावा लागेल. यावेळी अपडेट मतदान यंत्रे आली आहेत. त्यांचे रिजेक्शनचे प्रमाण कमी आहे. १०० टक्के मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था झालेली नाही. जिल्ह्यात १ कोटींच्या आसपास रक्कम आचारसंहितेच्या काळात जप्त करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदारसंघात १२ ठिकाणी महिला मतदान केंदे्र आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

पोलिसांचा बंदोबस्त असा  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले, ११६८ मतदान केंद्रे शहरात आहेत. त्यात ८३ केंद्रे जालना मतदारसंघात आहेत. ३ पोलीस उपायुक्त, ८ सहा. पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, १३० सहायक पोलीस निरीक्षक, २,८५४ पुरुष आणि ४०९ महिला पोलीस कर्मचारी मतदान प्रक्रियेत बंदोबस्ताला असतील. ८७० पुरुष, १४६ महिला कर्मचारी मतदान केंद्रांवर असतील. ६५९ होमगार्ड, ४ एसआरपी व पॅरामिल्ट्रीच्या तुकड्या, १५० अतिरिक्त कर्मचारी, ५ सीआयडी, २० बुथसाठी एक क्षेत्र अधिकारी नेमण्यात आला आहे. 

ग्रामीण पोलीस यंत्रणा अशीपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले, १८९९ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. त्यातील ९६३ औरंगाबाद तर ९३६ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. च्अपर अधीक्षक १, १२ पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक २०४, पोलीस कर्मचारी २५००, एसआरपी व इतर दलाच्या ५ तुकड्या, १७५० होमगार्ड मतदान प्रक्रियेसाठी नेमले आहेत. पुढील दोन दिवस पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019